sudhir joshi  saamTvNews
महाराष्ट्र

Sudhir Joshi Dies: ज्येष्ठ शिवसेना नेते सुधीर जोशी यांचे निधन!

सुधीर जोशी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत जवळचे सहकारी होते. शिवसेना पक्ष संघटनेत त्यांची भूमिका महत्वाची राहिली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : जेष्ठ शिवसेना नेते सुधीर जोशी (Sudhir Joshi) यांचे निधन झाले आहे. मृत्यूसमयी ते ८२ वर्षांचे होते. त्यांचा जन्म २५ मे १९५० रोजी मुंबईमध्ये झाला. त्यांचे संपूर्ण जीवन हे मुंबईमध्येच व्यतीत झाले. सुधीर जोशी यांना कोविड १९ संसर्गाची बाधा झाली होती व त्यांच्यावर मुंबईतल्या (Mumbai) जसलोक हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. त्यांनतर ते घरी परतले होते. (Shivsena Leader Sudhir Joshi Passes away)

सुधीर जोशी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत जवळचे सहकारी मानले जायचे. शिवसेना (Shivsena) पक्ष संघटनेत सुधीर जोशी यांची भूमिका महत्वाची राहिली आहे. सुधीर जोशी यांनी आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात शिवसेनेतूनच केली. १९६८ च्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत ते पहिल्यांदा निवडून येऊन नगरसेवक बनले. त्यानंतर १९७३ च्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेला मोठे यश प्राप्त झाले. या टर्मला जोशी यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे महापौरपद देखील भूषवले. शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचे ते अत्यंत निकटवर्तीय मानले जायचे.

त्यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात भूमिपुत्रांच्या प्रश्नांना घेऊनच झाली. मराठी माणसाच्या रोजगाराच्या प्रश्नांसाठी त्यांनी संघर्ष केला. ६० च्या दशकात मुंबईत औद्योगिकीकरण जोर धरत असताना यामध्ये स्थानिक मराठी जणांना नोकरीची संधी डावलण्यात येत होती. सगळ्या नोकऱ्या अमराठी जणांना, मराठी माणसाला मात्र पद्धतशीर डावलण्यात येत होते. मराठी माणसाला न्याय देण्यासाठी शिवसेनेची स्थापना झाली. मराठी माणसाच्या हक्कासाठी स्थापन झालेल्या या संघटनेमध्ये सुधीर जोशी यांची भूमिका महत्वपूर्ण होती.

१९८६ ते १९९९ पर्यंत त्यांनी विधानपरिषदेचे आमदार म्हणून कारकीर्द गाजवली होती. १९९२ ते १९९५ दरम्यान ते विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते देखील होते. सेना-भाजप युती सरकारच्या काळात त्यांनी मंत्रिपद भूषवले. १९७२ साली शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी लोकाधिकार समिती महासंघाची स्थापना केली. त्याचे पहिले अध्यक्ष देखील सुधीर जोशी यांना करण्यात आले होते.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Modi-Jinping: भारत-चीनमध्ये होणार नवी सुरुवात? रशियानंतर आता ब्राझीलमध्ये होऊ शकते मोदी-जिनपिंग भेट

Viral Video: चाळीतील महिलांची सर्वत्र चर्चा! दिलात झापुक झूपूक गाण्यावर केला जबरदस्त डान्स; VIDEO एकदा पाहाच

Apaar ID: प्रत्येक विद्यार्थ्याला मिळणार अपार कार्ड, १२ अंकी युनिक नंबर, उपयोग काय?

Maharashtra Politics : मला मविआने खलनायक ठरवलं, मराठा समाज हिंदुत्वाच्या बाजूने - देवेंद्र फडणवीस

Maharashtra Election : अबब! राज्यात पैशांचा महापूर, आचारसंहितामध्ये आतापर्यंत ५३६ कोटींची मालमत्ता जप्त!

SCROLL FOR NEXT