Shivsena leader Ramdas Kadam Saam Tv News
महाराष्ट्र

Politics: 'होय.. मुंबईतील डान्स बार माझ्याच पत्नीच्या नावावर' परबांच्या आरोपानंतर रामदास कदमांची कबुली

Shivsena leader Ramdas Kadam slams Anil Parab: गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्या नावावर असलेल्या सावली बारवर अश्लील नृत्यप्रकरणी कारवाई झाली. रामदास कदमांनी बार त्यांच्या पत्नीच्या मालकीचा असल्याची कबुली दिली.

Bhagyashree Kamble

गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्या नावावर मुंबईत सावली रेस्टॉरंट अँड बार आहे. या ठिकाणी पोलिसांनी छापा टाकला. कारवाई करत मुली ताब्यात घेतल्या. हा एक डान्सबार आहे, असा खळबळजनक आरोप शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परबांनी विधानपरिषदेत केलं होतं. त्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. परबांनी केलेल्या आरोपांवर शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी 'सावली बार माझ्याच पत्नीच्या मालकीचा आहे' अशी कबुली दिली. तसेच अनिल परबांवर टिका केली.

परबांचा आरोप - कदमांची कबुली

विधानपरिषदेत काल ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यांनी गृहराज्यमंत्र्यांच्या आईच्या नावावर मुंबईत बार असल्याचा आरोप केला होता. तसेच ३० मे रोजी बारवर कारवाई करण्यात आली असून, या कारवाईत २२ बारबाला, २५ ग्राहक, वेटर, कॅशियर आणि मॅनेजरवर कारवाई करण्यात आली होती, अशी माहिती एफआयआरमधून समोर आली आहे.

एफआयआरमध्ये नेमकं नेमकं काय काय?

कांदिवलीत सावली बारवर ३० मे २०२५ रोजी धाड.

गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या नावे सावली बार.

३० मे रोजी रात्री १०. ५० ते पहाटे ४ वाजेपर्यंत धाड.

बारमध्ये २२ बारबाला, २५ ग्राहक अन् ३ कर्मचारी.

काही बारबाला अश्लील नृत्य करत असल्याचे आढळले.

धाडीनंतर वेटर, कॅशियर, मॅनेजर पोलिसांच्या जाळ्यात.

बारचा परवाना ज्योती रामदास कदमांच्या नावे - मॅनेजरचा जबाब.

समता नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

३१ मे पासून सावली बार बंद.

'होय, सावली बार आमच्याच मालकीचा'

या प्रकरणावर रामदास कदम यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'होय, सावली बार आमच्याच मालकीचा आहे. बारची मालकी माझी पत्नी ज्योती रामदास कदम यांच्या नावे आहे. मात्र, बार चालवणारा दुसराच व्यक्ती आहे. शेट्टी बार चालवायचा, त्याला आम्ही काढून टाकले आहे. बार आम्ही बंद केलं आहे', असं रामदास कदम म्हणाले आहेत.

'नियमानुसार बार चालवणाऱ्यावर कारवाई होत असते. करारानुसार, बारमध्ये काही झाल्यास बार चालवणाराच जबाबदार असतो', असंही रामदास कदम म्हणाले. '१९९० साली बार सुरू करण्यात आलं. माझ्या पत्नीच्या नावे ३० वर्षांपासून परवाना आहे. व्यवसाय चालवणं हा गुन्हा आहे का? अनिल परब हे अर्धवट ज्ञान असलेले वकील आहेत', अशी टीकाही कदमांनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chaddi Gang Video : सोलापुरात चड्डी गँगची दहशत, साखर झोपेत असताना साधतेय डाव, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

Maharashtra Live News Update: झालं ते चुकीचं झालं, मारहाणीचा कडक शब्दात निषेध - तटकरे

Maharashtra Politics: रायगडमध्ये राष्ट्रवादीला खिंडार, अनेक बड्या नेत्यांनी सोडली अजित पवारांची साथ; 'धनुष्यबाण' घेतलं हाती

Ladki Bahin Yojana: या लाडक्या बहिणींचे १५०० रुपये बंद होणार, सरकारने पुन्हा सुरु केली पडताळणी

Maharashtra Monsoon Update : तीन दिवसात राज्यात जोरदार पाऊस; मुंबई, ठाण्याला झोडपणार, वाचा कोणत्या जिल्ह्यात कोणता अलर्ट

SCROLL FOR NEXT