Priyanka chaturvedi saam tv
महाराष्ट्र

सुप्रिया सुळेंसह देशभरातील महिलांची चंद्रकांत पाटील यांनी माफी मागावी - प्रियंका चतुर्वेदी

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका करताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची जीभ घसरली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्यावर जहरी टीका केली होती. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सुप्रिया सुळे यांच्यावर टीका करताना चंद्रकांत पाटील (chandrakant Patil) यांची जीभ घसरली होती. पाटील यांच्या वक्तव्याचे राजकीय वर्तुळात पडसाद उमटले असून शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी (Priyanka chaturvedi) यांनीही प्रतिक्रिया दीली आहे. भाजपकडून महिलांबाबत नेहमीच खालच्या पातळीवर टीका केली जाते. चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याने सध्या महागाईशी लढणाऱ्या देशातील सर्व महिलांचा अपमान झाला आहे. त्यामुळे सुप्रिया सुळेंसह देशभरातील महिलांची चंद्रकांत पाटील यांनी माफी मागावी, अशी मागणी चतुर्वेदी यांनी माध्यमांशी बोलताना केली आहे.

चंद्रकांत पाटील यांनी महिलांबाबत केलेल्या वक्तव्याचा प्रियंका चतुर्वेदींनी चांगलाच समाचार घेतला आहे. याबाबत माध्यमांशी बोलताना चतुर्वेदी म्हणाल्या, भाजपकडून महिलांबाबत नेहमीच खालच्या पातळीवर टीका केली जाते. चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याने सध्या महागाईशी लढणाऱ्या देशातील सर्व महिलांचा अपमान झाला आहे. त्यामुळे सुप्रिया सुळेंसह देशभरातील महिलांची चंद्रकांत पाटील यांनी माफी मागावी. संजय राऊत जेव्हा बोलतात,तेव्हा महाराष्ट्रा बरोबरच दिल्ली भाजपला देखील त्रास होतो. त्यामुळेच भाजपची सत्ता नसलेल्या महाराष्ट्रावर इडीचे विशेष प्रेम आहे. इडीच्या कारवाया होऊनही सरकार पडत नाही. याउलट सरकार मजबुतीने काम करत आहे.

नेमकं काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील ?

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्यावर टीका करताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांची जीभ घसरली.मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याशी ओबीसी आरक्षणासाठी संपर्क केला,पण त्यांनी दिल्लीत जाऊन काय केले हे सांगितले नाही',अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली होती. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी जोरदार टीका केली. "तुम्ही राजकारणात कशासाठी राहता, घरी जा, स्वयंपाक करा. ओबीसी आरक्षण मिळवून देण्यासाठी दिल्लीत जा,अन्यथा मसणात जा पण आरक्षण द्या.तुम्ही खासदार असून तुम्हाला एका मुख्यमंत्र्याची भेट कशी घ्यायची हे कळत नाही?" अशा कडक शब्दात चंद्रकांत पाटील यांनी सुप्रिया सुळेंवर बोचरी टीका केली होती.

सदानंद सुळे यांचंही चंद्रकांत पाटील यांना चोख प्रत्युत्तर

ओबीसींच्या राजकीय आरक्षणावरुन राज्यातलं राजकारण चांगलंच तापलं आहे. भाजपने काल (बुधवारी) मंत्रालयावर मविआ सरकारविरोधात मोर्चा काढला होता.यावेळी भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्यावर टीका करत असताना जीभ घसरली. त्यांच्या वक्तव्याचा सर्वच स्तरातून निषेध होत आहे.अशात सुप्रिया सुळे यांचे पती सदानंद सुळे (Sadanand Sule) यांनी चंद्रकांत पाटील यांनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे. मला मला माझ्या पत्नीचा अभिमान आहे असं म्हणत त्यांनी पत्नी सुप्रिया सुळे यांची पाठराखण केली आहे. चंद्रकांत पाटील यांनी सर्वच महिलांचा अपमान केला आहे, असा घणाघातही सदानंद सुळे यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर केला आहे.

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election Result : मुंबई कुणाची? ठाकरे, भाजप, शिंदे कुणाचा कोणत्या मतदारसंघात उमेदवार विजयी?

Broccoli Dishes: हिवाळ्यात सुपरफुड पेक्षा कमी नाही 'ब्रोकोली', आहारात समावेश करून पाहा

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: कर्जत-जामखेडमधून रोहित पवार विजयी

Ajaz Khan : सोशल मीडियावर हवा; मात्र राजकारणात डब्बागुल,'बिग बॉस' फेम अभिनेत्याचा दारूण पराभव

Tourist Spots: भारतातील सर्वाधिक भेट दिलेले 'ही' ५ पर्यटन स्थळ

SCROLL FOR NEXT