mla vaibhav naik & minister narayan rane saam tv
महाराष्ट्र

Sindhudurg: नारायण राणेंची कुडाळातील दहशत आज संपली,आता जिल्ह्यातील संपवणार : आमदार वैभव नाईक

आज नगराध्यक्षपदाची निवड हाेती.

साम न्यूज नेटवर्क

- विनायक वंजारे

सिंधुदुर्ग : कुडाळ नगरपचंयातीच्या नगराध्यक्षपदी काँग्रेस-शिवसेना आघाडीच्या आफ्रीन करोल यांची निवड झाली आहे. या निवडणुकीत करोल यांना नऊ तर भाजपच्या प्राजक्ता बांदेकर यांना आठ मतं मिळाली आहेत. गेली पाच वर्षे कुडाळ नगरपंचायतीत भाजपची एकहाती सत्ता होती. आजच्या निवडीमुळं भाजप नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे गटास हा जाेरदार धक्का म्हणावा लागेल. या निवडीनंतर शिवसेनेचे आमदार वैभव नाईक (vaibhav naik) यांनी सर्व सदस्यांचे अभिनंदन करुन राणेंची (narayan rane) दहशत यापुढं चालणार नाही हे आज सिद्ध झाल्याची भावना माध्यमांसमाेर व्यक्त केली. (Sindhudurg Latest Marathi News)

कुडाळ (kudal) नगरपंचायतीवर १७ पैकी आठ जागांवर भाजप , सात जागांवर शिवसेना व आणि जागांवर काँग्रेसचे नगरसेवक निवडून आले होते. आजच्या निवडणुकीत कुडाळाचा नगराध्यक्ष काेण हाेणार याची उत्सुकता हाेती. सेना आणि काॅंग्रेसने एकजूट दाखवत भाजपच्या उमेदवाराचा पराभव केला. दाेन जागा मिळविलेल्या काॅंग्रेस पक्षास नगराध्यक्षपद मिळाले.

यावेळी आमदार वैभव नाईक म्हणाले भाजपने सर्व प्रकारचे प्रयत्न करुन ही निवडणुक जिंकण्याचा दावा केला हाेता. त्यास महाविकास आघाडीच्या सर्व सदस्यांनी नकार घंटा देत कुडाळात झेंडा रोवला आहे. या पुढं नारायण राणेंची दादागिरी चालू देणार नाही. पन्नास पन्नास लाख रूपये घेऊन भाजपवाले फिरत होते. मात्र महाविकास आघाडीचा एकही नगरसेवक फुटला नाही. मतदानापासून रोखण्यासाठी भाजपने आजचा राडा केला असेही आमदार नाईकांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vasai: वसईत भाजप-बविआ कार्यकर्ते भिडले, पोलिसांकडून लाठीचार्ज; VIDEO समोर

चंद्रपुरात काँग्रेस बाजी मारणार? विजय वड्डेटीवारांची खेळी यशस्वी ठरली

Municipal Elections Voting Live updates: उल्हासनगर महानगरपालिका निवडणूक; पॅनल क्रमांक 18 मधील मत पेट्या घेऊन जाताना गोंधळ

Saam TV exit poll: परभणीत सर्वात ठाकरेसेना ठरणार मोठा पक्ष; सत्ता कोणाच्या हाती येणार?

Saam Tv Exit Poll: छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे बंधूंचा जोर कमी पडला? कुणाची सत्ता येणार? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT