Manohar Joshi Passed Away Saamtv
महाराष्ट्र

Manohar Joshi: बाळासाहेबांचा सच्चा शिवसैनिक, नगरसेवक ते शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री; मनोहर जोशींचा धगधगता राजकीय प्रवास

Manohar Joshi News: प्रबोधनकार ठाकरे ते आदित्य ठाकरे अशा ठाकरे घराण्याच्या चार पिढ्यांसोबत त्यांनी काम केले. त्यांच्या निधनानंतर बाळासाहेबांचा सच्चा शिवसैनिक हरपल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली आहे.

Gangappa Pujari

Manohar Joshi Passed Away:

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते डॉ. मनोहर जोशी यांचे निधन झाले. दोन दिवसांपूर्वी मनोहर जोशी यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांच्यावर मुंबईच्या हिंदूजा रुग्णालयात उपचार सुरू होते. वयाच्या ८७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बाळासाहेबांचे कडवट शिवसैनिक ते शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री असा त्यांचा यशस्वी राजकीय प्रवास होता.

माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी (Manohar Joshi) हे मुळचे बीडचे. त्यांचा जन्म 2 डिसेंबर 1937 मध्ये रायगड जिल्ह्याच्या नांदवी गावात एका मध्यमवर्गीय कुटूंबात झाला. शिक्षणासाठी मनोहर जोशी हे मुंबईमध्ये आले. एम. एची पदवी घेतल्यानंतर त्यांनी मुंबई नगरपालिकेत नोकरी सुरू केली. मात्र नोकरीपेक्षा व्यवसायात रस असल्याने त्यांनी कोहिनूर इंस्टिट्यूटची स्थापना केली.

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या विचाराने प्रेरित होऊन मनोहर जोशी यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. शिवसेनेकडून विधानपरिषदेवर निवडून येत त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीचा श्रीगणेशा केला होता. त्यानंतर ते २ टर्म नगरसेवकही होते. बाळासाहेबांचे अत्यंत विश्वासू, जवळचे मानले जाणारे मनोहर जोशी हे 1976 ते 1977 या काळात मुंबईचे महापौरही राहिले.

1995-99 मध्ये भारतीय जनता पक्ष- शिवसेना युतीने काँग्रेसचा पराभव केल्यानंतर मनोहर जोशी हे शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री झाले. त्यानंतर 1999 ते 2002 या काळात ते लोकसभेचे अध्यक्ष देखील राहिले आहेत. शेवटपर्यंत शिवसेनेसाठी त्यांनी आपले जीवन वाहिले. प्रबोधनकार ठाकरे ते आदित्य ठाकरे अशा ठाकरे घराण्याच्या चार पिढ्यांसोबत त्यांनी काम केले. त्यांच्या निधनानंतर बाळासाहेबांचा सच्चा शिवसैनिक हरपल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nagpur : पिकांच्या संरक्षणासाठी तारेत सोडला विद्युत प्रवाह; चारा कापताना झाला घात, विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू

Aamhi Saare Khavayye : खुशखबर! मराठी कुकिंग शो 'आम्ही सारे खवय्ये' येतोय? पाहा VIDEO

Rave Party: रेव्ह पार्टी म्हणजे नेमकं काय?

Maharashtra Live News Update: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांची इच्छा - नितेश राणे

Masala Gobi Recipe : कोबीच्या भाजीला द्या खास ट्विस्ट, मुलं ५ मिनिटांत फस्त करतील टिफिन

SCROLL FOR NEXT