Suhas Kande Vs Aditya Thackeray In Nashik Saam TV
महाराष्ट्र

Manmad : आदित्य ठाकरे आणि सुहास कांदे आमने सामने; "मातोश्रीवर या" ठाकरेंचं आवाहन

Suhas Kande Vs Aditya Thackeray : आदित्य ठाकरेंना भेटण्यासाठी त्यांनी परवानगी मागितली होती. "माझं काय चुकलं" अशा आशयाचे बॅनर्सही सुहास कांदे यांच्या मतदारसंंघात लागले आहेत.

अभिजित सोनावणे, साम टीव्ही, नाशिक

नाशिक: राज्यात सत्तांतर झाल्यानंतर गळती लागलेल्या शिवसेनेला (Shivsena) सावरण्यासाठी ठाकरे घराण्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) हे नाशिक दौऱ्यावर आहेत. नाशिकच्या मनमाडमध्ये (Manmad) आज त्यांचा दौरा होत आहे. याठिकाणी नांदगाव मतदारसंघाचे बंडखोर आमदार सुहास कांदे (Suhas Kande) यांनी आदित्य ठाकरेंच्या आधीच मेळावा घेतला आहे, ते आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह शक्तिप्रदर्शन करणार आहे. आदित्य ठाकरेंना भेटण्यासाठी त्यांनी परवानगी मागितली होती. "माझं काय चुकलं" अशा आशयाचे बॅनर्सही सुहास कांदे यांच्या मतदारसंंघात लागले आहेत. आदित्य ठाकरेंचा मेळावा ज्याठिकणी होणार आहे, त्याठिकाणी आता सुहास कांदे पोहोचत आहेत, त्यामुळे मनमाडला पोलिस छावणीचं स्वरुप आलं आहे. (Suhas Kande Latest News)

हे देखील पाहा -

माझं काय चुकलं?

आदित्य ठाकरे यांच्या या मेळाव्याआधी बंडखोर आमदार सुहास कांदे यांनी काही प्रश्न विचारले आहेत. पालघर साधू हत्याकांड, मालवण येथील हिंदूंचं पलायन, स्वातंत्र्यवीर सावरकर या हिंदुत्वाच्या मुद्द्यापसून शिवसेना दूर गेली, यावर 'माझं काय चुकलं' असं म्हणत सुहास कांदे यांनी सवाल उपस्थित केले आहेत. त्यांच्या या निवेदनात छगन भुजबळ, नवाब मलिक यांच्यासोबत युती केल्याचीही खंत व्यक्त करण्यात आली आहे. हे निवेदन आदित्य ठाकरे यांना देण्याआधीच सोशल मीडियावर वेगवेगळ्या पोस्ट व्हायरल करत कांदे यांनी आदित्य ठाकरे यांना अनेक सवाल विचारले आहेत. आदित्य ठाकरे यांना या सगळ्या प्रश्नांचे निवेदन देण्यासाठी सुहास कांदे चार ते पाच हजार कार्यकर्ते घेऊन जाणार आहेत. सुहास कांदे यांच्या या भूमिकेमुळे आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

शिवसैनिकांकडून सुहास कांदेंचा निषेध

पिंपळगाव टोल नाक्यावर आमदार सुहास कांदे यांचा शिवसैनिकांकडून निषेध करण्यात आला आहे. आदित्य ठाकरेंना आव्हान दिल्याने शिवसैनिकांनी सुहास कांदेंच्या विरोधात घोषणाबाजी केली. आदित्य ठाकरेंच्या मेळाव्याला पोलिसांनी मेळाव्याच्या १ तास अगोदर परवानगी दिली. आमदार सुहास कांदेंनीही मेळाव्याला परवानगी मागितली. त्यानंतर कांदेंच्या मेळाव्याला परवानगी देऊ, पण आदित्य ठाकरेंच्या भेटीला परवानगी दिली जाणार नाही अशी पोलीस अधीक्षकांनी माहिती दिली.

आदित्य ठाकरे यांच्या आधी सुहास कांदे यांनीच घेतला मेळावा

दरम्यान आदित्य ठाकरेंच्या मेळाव्याआधी सुहास कांदे यांनीच मेळावा घेतला. मेळाव्यानंतर कांदे त्यांच्या कार्यकर्त्यांसह आदित्य ठाकरे यांच्या भेटीला जाणार आहेत. त्यामुळे मनमाडमध्ये सुहास कांदे आणि आदित्य ठाकरे आमने सामने आल्याने मनमाडला पोलीस छावणीचे स्वरुप आले आहे.

सुहास कांदेंनी मातोश्रीवर यावं - आदित्य ठाकरे

दरम्यान आपण बंडखोर आमदार सुहास कांदेंना भेटणार का? असा प्रश्न पत्रकारांनी आदित्य ठाकरेंना विचारला असता ते म्हणाले, आदित्य ठाकरेंनी नक्की भेटू, त्यांनी मातोश्रीवर यावं. मातोश्रीचे दरवाजे नेहमी उघडे आहेत असं म्हणत त्यांनी सुहास कादेंना मातोश्रीवर येण्याचं आवाहन केलं आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune: 'मला पप्पी दे, माझ्याकडे पैसे आहेत'; ७३ वर्षीय वृद्धाकडून २७ वर्षीय तरूणीचा विनयभंग, पुण्यात खळबळ

Coffee while fasting: कॉफी प्यायल्याने उपवास मोडला जातो का?

Nashik Rain: नाशिकच्या गंगापुर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढला, अन् एक तरुण रामकुंडात अडकला, पाहा थरारक प्रसंग|VIDEO

Maharashtra Live News Update: सुरत शहराच्या उधना-नवसारी रोडवर पावसाचे पाणी साचले

Mahadev Munde Case : व्यापारी महादेव मुंडे हत्या प्रकरण; पोलिसांनी नोंदविला बाळा बांगरचा जवाब, ६ तास कसून चौकशी

SCROLL FOR NEXT