ShivSena kolhapur Saam Tv
महाराष्ट्र

खासदार धैर्यशील मानेंविरोधात कोल्हापुरात शिवसैनिक आक्रमक

आमदारांपाठोपाठ आता शिवसेनेच्या १२ खासदार शिंदे गटात गेले आहेत.

संभाजी थोरात

कोल्हापूर: शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह ४० आमदारांनी बंड केले, त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले. भापजसोबत जात शिंदे गटाने सरकार स्थापन केले. आमदारांपाठोपाठ आता शिवसेनेच्या १२ खासदार शिंदे गटात गेले आहेत. यात कोल्हापुरचे खासदार धैर्यशिल माने यांचाही सहभाग आहे. याविरोधात आज कोल्हापुरात शिवसैनिकांनी आंदोलन सुरू केले आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातून हजारो शिवसैनिक कोल्हापुरात (Kolhapur) दाखल झाले आहेत. हे शिवसैनिक रुईकर कॉलनी येथे धैर्यशील माने यांचे निवासस्थानावर हा मोर्चा जाणार आहे. पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवला आहे.

आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापूरमध्ये भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या घरी येणार आहेत. या पार्श्वभूमिवर आज कोल्हापूरात मोठा पोलिस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला आहे. शिवसैनिक आज धैर्यशील माने यांच्या घराजवळ जावून जाब विचारणार आहेत.

तर दुसरीकडे धैर्यशील माने गेल्या पाच दिवसांपासून दिल्लीत आहेत.आंदोलनात सहभागी झालेले शिवसैनिक आक्रमक झाले आहेत.

काही दिवसांपूर्वी कोल्हापुरात शिवसैनिकांनी मोर्चा काढला होता, त्यावेळी मोठा गोंधळ निर्माण झाला होता. त्यामुळे आजच्या आंदोलनाला पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: गुजरातच्या पोरबंदरवरून मोठा अमली पदार्थांचा साठा जप्त

VIDEO : शिवाजी पार्कवर मनसेच्या सभेला परवानगी; राज ठाकरे काय भूमिका घेणार?

Beed News : क्षीरसागरांचा ४० वर्षाचा दबदबा मिटवायचाय; आशुतोष मेटेंचे क्षीरसागरावर टीकास्त्र   

Tim Southee: टीम साऊदीचा टेस्ट क्रिकेटला रामराम; WTC आधीच न्यूझीलंडची 'कसोटी' लागणार

Gujarat ATS: गुजरात एटीएसची मोठी कारवाई; 500 किलो ड्रग्स जप्त, इरानी बोटीतून होत होती तस्करी

SCROLL FOR NEXT