Uddhav thackeray  Saam Tv
महाराष्ट्र

'उध्दव ठाकरे यांच्यावरील संकट दूर व्हावे' शिवसैनिकांचे आराध्य दैवत राजेश्वराला साकडे

शिवसेनेचे नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडाच 'राजकारण' केल्याने महाविकास आघाडीत मोठी बिघाडी झाली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अकोला : महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेनेचे नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडाच 'राजकारण' केल्याने महाविकास आघाडीत मोठी बिघाडी झाली आहे. शिंदे जवळपास ४० समर्थक आमदारांसह राज्याच्या गुवाहाटीत एका हॉटेलमध्ये सत्तास्थापनेत्या आकडेवारीचं गणित सोडवण्यात व्यग्र आहेत. एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीच्या भूमिकेमुळं शिवसेनेसह महाविकास आघाडीला (mva government) मोठा धक्का बसला आहे.

त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. पण अकोल्यातील निष्ठावंत शिवसैनिक पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (uddhav Thackeray) यांच्यासोबत आहेत. उद्धव ठाकरे यांच्यावर आलेलं संकट दूर होण्यासाठी अकोल्यातील आराध्य दैवत असलेल्या राजराजेश्वर महाराज यांना शिवसैनिकांनी साकडे घातले आहे. काल मुंबईतही मातोश्रीबाहेर शिवसैनिकांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत ठाकरे कुटुंबीयांना पाठिंबा दर्शवला. शिंदे यांनी आमदारांसोबत मुंबईत यावे, अशी आर्त हाक शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनी सोशल मीडियाद्वारे दिली होती.

एकनाथ शिंदे यांच्या ट्विटमुळं राजकीय वातावरण तापलं

दरम्यान, शिवसेना (Shivsena) विधिमंडळ मुख्य प्रतोद पदी शिवसेना आमदार भरत गोगावले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सबब, सुनील प्रभू यांनी आजच्या आमदारांच्या बैठकीबद्दल काढलेले आदेश कायदेशीरदृष्ट्या अवैध आहेत, असं ट्विट नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. त्यांच्या या ट्विटनंतर राजकीय वातावरण तापलं आहे.

दिपाली सय्यद यांचं ट्विट चर्चेत

"माननीय उद्धव साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब यांची श्रीराम लक्ष्मणाची जोडी हिंदुत्वाच्या वनवासात कायम राहील. शिवसैनिकांनो रडायचे नाही लढायचे. आपले मत शिवसेनेला कायम राहील. हा रामराज्याचा संघर्ष महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्ण अक्षरात लिहीला जाईल". अशा स्वरुपाचं ट्विट दीपाली सय्यद यांनी केलं आहे.

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सोन्याच्या भावात अचानक मोठी उलथापालथ! आठवड्यात सोनं तब्बल ₹३,४४० ने स्वस्त; पाहा १८, २२ अन् २४ कॅरेटचे नवे दर?

Maharashtra News Live Update: कृष्णराज महाडिक नेमके काँग्रेसचे की भाजपचे?

Supreme Court : केंद्र सरकारचा मोठा निर्णय! महाराष्ट्रासह ८ राज्यातील उच्च न्यायालयांना नवे मुख्य न्यायाधीश; पाहा कोणाची कुठे नियुक्ती

Best Teas For Weight Loss: वजन कमी करण्यासाठी 5 चहा ठरतील फायदेशीर; जाणून घ्या कोणते आहेत?

Ukadiche Modak Recipe : उकडीचे मोदक फाटतात? 'ही' ट्रिक वापरा, प्रत्येक मोदक बनेल परफेक्ट

SCROLL FOR NEXT