EKnath Shinde Saam Tv
महाराष्ट्र

गोव्यात जल्लोष; आमदारांना घ्यायला मुख्यमंत्री शिंदे दाखल

यावेळी शिवसेना आणि सहयोगी आमदारांच्या वतीने त्यांचं गोव्यात जंगी स्वागत करण्यात आले.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: राज्याच्या राजकारणातील अनेक नाट्यमय घडामोडींनतर काल एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री पदाची शपथ दिली. हा शपथविधी सोहळा राजभवन येथे पार पडला.

शपथविधी सोहळा संपन्न झाल्यानंतर महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रात्री उशीरा गोवा येथील ताज हॉटेलमध्ये पोहोचले. यावेळी शिवसेना आणि सहयोगी आमदारांच्या वतीने त्यांचं गोव्यात जंगी स्वागत करण्यात आले. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनीही पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले. तर शिवसेनेच्या महिला आमदारांनी त्यांना ओवाळून त्यांचं स्वागत केलं. यावेळी आमदारांनी आपल्या हस्ते पेढा भरवत त्यांचं तोंड गोड केलं.

हे देखील पाहा -

राजभवनात हा छोटेखानी शपथविधी सोहळा झाला. यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या आशिर्वादाने मी ही शपथ घेतो, अशी सुरुवात करत एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला शोभेल अशाच प्रकारे सर्व विरोधकांनी आणि सहकारी पक्षांनी देखील या नवीन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

राजभवनात पार पडलेल्या शपथविधी सोहळ्याला केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड, रावसाहेब दानवे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, भाजपनेते आशिष शेलार, प्रवीण दरेकर यांच्यासह अनेक भाजप नेते आणि मान्यवर उपस्थित होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: गडचिरोली - पोटेगावकडे जाणारी ST बस उलटली, 20 ते 25 प्रवासी जखमी

लालबागच्या राजाच्या दर्शनावेळी पुण्याच्या तरुणाचा मृत्यू

By-Election: पोटनिवडणुकीत नाट्यमय घडामोडी! टीएमसीच्या उमेदवाराचा यु-टर्न आधी 'नो नंतर हो'; मनधरणीनंतर थोपटले दंड

Latest Mangalsutra Design: छोटं की लांब; तुमच्यासाठी कोणतं मंगळसूत्र उठून दिसेल

Watli Dal Recipe: गणपती विसर्जनाच्या नैवेद्यासाठी बनवा ही खमंग वाटली डाळ

SCROLL FOR NEXT