Ambadas Danve On BJP, Aurangabad News  SAAM TV
महाराष्ट्र

Maharashtra Politics : ...तर भाजपने महाराष्ट्र डोक्यावर घेतला असता; कळवा हॉस्पिटलमधील घटनेवर अंबादास दानवे तुटून पडले

Ambadas Danve On BJP : कळवा येथील रुग्णालयातील घटनेवरून विरोधकांनी राज्य सरकारला धारेवर धरले.

डॉ. माधव सावरगावे

Ambadas Danve On BJP Politics : ठाणे महापालिकेच्या कळवा येथील रुग्णालयात २४ तासांत १८ हून अधिक रुग्णांचा मृत्यू झाल्याच्या घटनेवरून विरोधकांनी राज्यातील शिंदे-फडणवीस-अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील सरकारला धारेवर धरले आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी थेट भाजपवर निशाणा साधला. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील सरकारच्या काळात अशी घटना घडली असती तर, भाजपने महाराष्ट्र डोक्यावर घेतला असता, असा घणाघात दानवेंनी केला.

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी कळवा रुग्णालयातील रुग्णांचा मृत्यू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शहांचे महाराष्ट्रातील दौरे आणि सध्याची राजकीय परिस्थिती आदी मुद्द्यांवरून राज्य सरकारला लक्ष्य केलं आहे. (Tajya Batmya)

ठाण्यातील (Thane) कळवा येथील रुग्णालयातील घटनेवर बोलताना दानवे म्हणाले की, 'दुसऱ्या कोणत्या राज्यात जर इतके लोक दगावले असते तर, भाजपने त्या सरकारचा राजीनामा मागितला असता, अशी टीका दानवेंनी केली.

ठाणे हे मुख्यमंत्र्याचे मानले जाते, मग आता त्यांची जबाबदारी आहे. १८ लोक जाऊनही त्याचं गांभीर्य या सरकारला नाही. राजकीय अस्वस्थतेमुळे अशा विषयावर लक्ष दिले जात नसल्याचा आरोपही दानवेंनी केला. (Maharashtra Politics)

आम्हाला चिन्ह मिळाले नाही तर, आम्ही भाजपच्या चिन्हावर लढू असे काही आमदार म्हणाले आणि भाजपला तेच अपेक्षित आहे. आम्ही त्याचीच वाट पाहतोय, तुम्ही कोणत्या चिन्हावर लढता! तुम्ही कोणत्याही चिन्हावर लढवा, आम्ही तुम्हाला घरी पाठवू, असे आव्हान दानवेंनी शिंदे गटाला दिले.

मोदी-शाह यांच्यावर टीका

अंबादास दानवे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शहांच्या महाराष्ट्र दौऱ्यावरूनही टीका केली आहे. दिल्लीवरून यापूर्वी अनेक बादशहा आले. महाराष्ट्राने त्यांना परत पाठवले. आता दुसरे शहा महाराष्ट्रात आले आहेत. महाराष्ट्राची भूमी त्यांना परत पाठवेल. असे शहा-मोदी कितीही आले तरी महाराष्ट्र लढणारच, असा हल्लाबोल दानवे यांनी केला.

दिल्लीच्या लोकांनी महाराष्ट्रातच घर करावे अशी स्थिती निर्माण झाली आहे. एक दिवस मोदी साहेब, एक दिवस अमित शहासाहेब असे महिन्यातून एकदा-दोनदा येतात. भाजप स्वबळावर जिंकू शकत नाही, हे त्यांना आता स्पष्ट कळाले आहे. आधी शिवसेना फोडली, राष्ट्रवादी फोडली आणि पुन्हा राष्ट्रवादी...तरीही महाराष्ट्रात त्यांचे समाधान झालं नाही. सगळ्या गोष्टी करूनही महाराष्ट्र त्यांच्या बाजूने उभा राहत नाही हा संदेश आहे, असा टोला दानवेंनी लगावला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saim Ayub: वनडे क्रिकेटच्या इतिहासात जे कोणालाच जमलं नाही, ते सॅम अयूबने करुन दाखवलं

Beetroot Benefits: हिवाळ्यात बीट खाण्याचे 'हे' फायदे तुम्हाला माहिती आहेत का?

Constitution Day : संविधान वर्तमान आणि भविष्याचे मार्गदर्शक; संविधान दिनी PM मोदींचा दहशतवाद्यांनाही कडक इशारा

Health Tips: हिवाळ्यात थंड पाण्याने आंघोळ केल्याने मिळतात जबरदस्त फायदे; जाणून घ्या

Maharashtra Politics : मुख्यमंत्रिपदाचा पेच सुटला? भाजपकडून एकनाथ शिंदे यांना दोन ऑफर

SCROLL FOR NEXT