Vinayak Mete Passes Away
Vinayak Mete Passes Away Saam TV
महाराष्ट्र

VIDEO : विनायक मेटे अनंतात विलीन; पार्थिवाला अग्नी देताच अनेकांना अश्रू अनावर

डॉ. माधव सावरगावे

औरंगाबाद : शिवसंग्रामचे अध्यक्ष तथा माजी आमदार विनायक मेटे (Vinayak Mete) यांच्या पार्थिवावर बीडमध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. राजेगाव या त्यांच्या मूळ गावी हजारो कार्यकर्त्यांच्या साक्षीने त्यांना साश्रू नयनांनी अखेरचा निरोप देण्यात आला. मेटेंनना पोलिसांकडून मानवंदनाही देण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, (Eknath Shinde) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा नेत्या पंकजा मुंडे, खासदार प्रीतम मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह सर्वपक्षीय नेते उपस्थित होते. (Vinayak Mete Passes Away)

मराठा आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आणून मोठं आंदोलन उभे करणारे विनायक मेटे यांना अखेरचा निरोप देण्यासाठी बीडमध्ये कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली. आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप देण्यासाठी राज्यभरातून हजारो कार्यकर्ते आले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले. यांच्यासह मंत्रिमंडळातील अनेक मंत्री, आमदार, खासदार यावेळी उपस्थित होते.

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर मोटार अपघातात रविवारी विनायक मेटे यांचे निधन झाले. ते ५२ वर्षांचे होते. आज त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, मेटे कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी असल्याची प्रतिक्रिया यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. (Vinayak Mete Biography In Marathi)

विनायक मेटे हे सामान्य शेतकरी कुटुंबातून होते. त्यांनी कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना मराठा महासंघाच्या चळवळीतून सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात आपले नेतृत्व प्रस्थापित केले होते. पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळ विधानपरिषदेचे सदस्य राहणारे ते राज्यातील एकमेव नेते होते.

विनायक मेटे यांच्या पार्थिवाला त्यांच्या मुलाने अग्नि देताच हजारो कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले. आपला लाडका नेता आपल्यात नाहीत या कल्पनेने अनेकांना हुंदका अनावर झाला. कार्यकर्त्यांच्या डोळ्यातून आपोआप अश्रू आले. तर काहींनी हंबरडा फोडत आपला दुखावेग व्यक्त केला. यावेळी अमर रहे, अमर रहे, विनायक मेटे अमर रहेच्या घोषणाही देण्यात आल्या.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

RCB vs CSK IPL 2024 : बेंगळुरूची प्लेऑफमध्ये एन्ट्री पक्की; चेन्नई आयपीएलमधून बाहेर

Indian Politics 2024 : भाजप झाला मोठा संघ झाला छोटा;'आधी RSS ची गरज, आता भाजप सक्षम'

Crime News: युट्यूब पाहून छापल्या लाखोंच्या बनावट नोटा; 9 वी पास तरुणाचा कारनामा

Maharashtra Politics: 'नावं द्या त्या पोलिसांना बघतो मी', उद्धव ठाकरेंनी भरला पोलिसांना दम; मुलुंडच्या राड्यावरून ठाकरेंचा संताप

Kalyan Crime News : यूपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणीवर ज्वलनशील पदार्थ लुटलं, कल्याणमधील घटनेने खळबळ

SCROLL FOR NEXT