Chhatrapati shivaji Maharaj
Chhatrapati shivaji Maharaj Saam Tv
महाराष्ट्र

Shivrajyabhishek Din : किल्ले रायगडावर तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा, देशभरातून शिवभक्त दाखल

साम टिव्ही ब्युरो

Shivrajyabhishek Din : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याचं यंदाचे ३५० वे वर्ष आहे. किल्ले रायगडावर राज्याभिषेक सोहळ्याचे औचित्य साधून दिमाखदार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. देशभरातून शिवप्रेमी किल्ले रायगडावर दाखल झाले आहेत.

ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला म्हणजेच आजच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याला ३५० वर्ष पूर्ण होत आहेत. रायगडवर आज तिथीप्रमाणे शिवराज्याभिषेक दिन साजरा केला जात आहे. 6 जूनपर्यंत हो सोहळा साजरा करण्यात येणार आहे. (Latest Marathi News)

राज्य शासनाच्या वतीनं आयोजित या सोहळ्याला गुरुवारी शिर्काईमातेच्या पूजनानं सुरुवात झाली. त्यानंतर दिवसभरात रायगडावरील गंगासागर तलाव आणि विविध देवदेवतांचं पूजन करण्यात आलं. शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्तानं रायगडावर ५ आणि ६ जून या कालावधीत अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

किल्ले रायगडावर आज पार पडणाऱ्या राज्याभिषेक सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. पुढील काही दिवस देशभरातून शिवभक्त रायगडावर येतील. या सर्वांच्या जेवणानी आणि न्याहरीची सोय किल्ल्यावरच करण्यात आली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert: राज्यात आजही पावसाचा इशारा, तब्बल १७ जिल्ह्यांमध्ये कोसळणार पाऊस, वाचा वेदर रिपोर्ट

Rashi Bhavishya : या राशींच्या मनासारख्या घटना घडतील, प्रलंबित कामे होतील पूर्ण; वाचा संपूर्ण राशिभविष्य

Horoscope Today : 'या' राशीच्या लोकांचं भाग्य सोन्यासारखं चमकणार

Maharashtra Election: उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या मतदानाची का होतेय चर्चा?

Dindori Loksabha Election: दिवस मावळला तरी मतदार येईना; एकही मत न देणारं मेव्हणं गाव आलं चर्चेत

SCROLL FOR NEXT