shivpratishthan yuva hindustan demands to close cafes with private spaces in sangli  Saam Digital
महाराष्ट्र

Sangli : 'शिवप्रतिष्ठान'ची प्रशासनास दाेन दिवसांची मुदत, सांगली बंदचा दिला इशारा;जाणून घ्या नेमकं कारण

सांगली शहरातील तीन कॅफे शॉपच्या तोडफोड प्रकरणी पोलिसांनी 16 जणांना ताब्यात घेतले आहे. त्यांची चाैकशी सुरु आहे अशी माहिती वरिष्ठ पाेलिस अधिकारी रितू खोकर यांनी साम टीव्हीशी बाेलताना दिली.

विजय पाटील

सांगलीसह जिल्ह्यातील कॅफे शॉपमध्ये हाेणारे गैरप्रकार थांबविण्यासाठी येत्या दोन दिवसांत अयाेग्य कॅफे शाॅपवर कारवाई करा अन्यथा पुन्हा रस्त्यावर उतरू आणि प्रसंगी सांगली बंद करू असा इशारा शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे अध्यक्ष नितीन चौगुले यांनी आज (शुक्रवार) प्रशासनास दिला. त्याबाबतचे निवेदन शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानने सांगली पोलिसांनी दिले आहे. (Maharashtra News)

सांगली शहरातील कॅफे शॉपमध्ये अश्लील चाळे सुरू असल्याचा आरोप करत आज शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांकडून तीन कॅफे शॉपची ताेडफाेड केली. यानंतर शिवप्रतिष्ठान युवाचे अध्यक्ष नितीन चौगुले यांनी चुकीच्या गाेष्टी कॅफे शाॅपमध्ये चालणार असतील तर प्रसंगी रस्त्यावर उतरु असा इशारा दिला.

चौगुले म्हणाले सांगली शहरातील एका मुलीला कॅफे शॉप मध्ये गुंगीच औषध देऊन तिच्यावर अत्याचाराचा प्रकार घडला. त्यामुळे संतप्त भावनेतून शहरातील 3 कॅफे शॉपची तोडफोड कार्यकर्त्यांनी केली. यापुढील काळात कॅफे शाॅपवर कारवाई होणार नसेल तर कॅफे शॉप विरोधातील आंदोलन राज्यभर उभे करू असा इशारा देखील शिवप्रतिष्ठान युवाच्या वतीने नितीन चौगुले यांनी दिला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

'त्या' 16 जणांची पाेलिस चाैकशी सुरु : रितू खोकर

दरम्यान शहरातील तीन कॅफे शॉपच्या तोडफोड प्रकरणी पोलिसांनी 16 जणांना ताब्यात घेतले आहे. त्यांची चाैकशी सुरु आहे अशी माहिती वरिष्ठ पाेलिस अधिकारी रितू खोकर यांनी साम टीव्हीशी बाेलताना दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Makeup Tips: इंडियन स्किन टोननुसार मेकअप कसा निवडावा? फाउंडेशनपासून ब्लशपर्यंत जाणून घ्या ७ सोप्या टिप्स

ताप किती अंश धोकादायक आहे? या किरकोळ समस्या हलक्यात घेऊ नका

Maharashtra News Live Update: मुंबई-गोवा महामार्गावर कुडाळ येथे बर्निंग डंपरचा थरार

समृद्धी महामार्गावर १२ दिवस वाहतूक ब्लॉक; प्रवास करण्याआधी वेळापत्रक पाहा

Black Coffee With Ghee Benefits: ब्लॅक कॉफीमध्ये हे ३ पदार्थ मिसळून प्या; शरीराला मिळतील ७ आरोग्यदायी फायदे

SCROLL FOR NEXT