shivendraraje bhosale 
महाराष्ट्र

नेत्यांचे उंबरठे का झिजवले; शिवेंद्रराजेंचा उदयनराजेंना प्रश्न

शिवेंद्रसिंहराजेंनी सुरुची बंगला येथे आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी उदयनराजेंवर सडकून टीका केली.

साम न्यूज नेटवर्क

सातारा (satara) : खासदार उदयनराजे भाेसले (udayanraje bhosale) यांनी सातारकरांना फसविणे बंद करावे. केवळ डायलाॅग बाजी करुन विकास हाेत नसताे. आता पुन्हा काही तरी नवीन डायलाॅग निघेल असे आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले (shivendraraje bhosale) यांनी नमूद केले. शिवेंद्रसिंहराजेंनी सुरुची बंगला येथे आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी उदयनराजेंवर सडकून टीका केली. ते म्हणाले मी लहान आहे त्यामुळे माझी बुद्धी लहान आहे असे मी म्हणेन परंतु तुमची माेठी आहे तर स्थायी समितीत ४०० विषय कसे घेतले गेली. ही बैठक किती वेळ चालली पाहिजे हाेती आणि किती वेळ चालली असा प्रश्न उदयनराजेंना केला.

शिवेंद्रसिंहराजे म्हणाले माझी वाढ झाली परंतु बुद्धी छाेटीच राहिली असे खासदार उदयनराजे यांनी म्हटलं ठीक आहे. तुमची बुद्धी अफाट आहे. त्यांच्या बुद्धीचे अविष्कार आणि पराक्रम पाहिलं तर लाेकांतून निवडून आल्यानंतर राजीनामा देत राज्यसभेत ते जाऊन बसलेत. आता ते मागच्या दाराने खासदार झालेत. हा त्यांच्या बुद्धीचा पराक्रम असल्याची टिप्पणी शिवेंद्रसिंहराजेंनी केली. तुमची बुद्धी एवढी माेठी आहे तर जिल्हा बॅंकेत निवडून येण्यासाठी कशासाठी जिल्ह्यातील नेत्यांचे उंबरे झिजवले.

नगरविकास आघाडी कायम पालिकेतील चुकीच्या गाेष्टींवर बाेलत आले आहे. पुन्हा सत्ता मिळविण्यासाठी त्यांचा उद्याेग सुरु आहे. डायलाॅग बाजी करायची आणि जनतेला भुलवायचे हे आता हाेणार नाही. आता सातारा विकास आघाडीला घरी बसवण्याची वेळ आली आहे हे त्यांनी समजून घ्यावे असे शिवेंद्रसिंहराजेंनी नमूद केले.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chilled Water: थंड पाणी पिणे फायदेशीर की हानिकारक? जाणून घ्या शरीरावर होणारे ७ परिणाम!

Gold Rate Today: नवरात्रीत सोन्याच्या दरात मोठी घसरण, 10 तोळा सोनं 3,900 रुपयांनी स्वस्त; वाचा 18k- 22k आणि 24k चे दर

Maharashtra News Live Update : जंतर-मंतरवर खळबळ! CJPचे प्रवक्ते सौरव दास आणि आशुतोष रांका पोलिसांच्या ताब्यात

Papaya Leaf Juice Benefits for Platelets: रक्तातील प्लेटलेट्स वाढवण्यासाठी प्या पपईच्या पानांचा रस; जाणून घ्या योग्य पद्धत

ट्रॅफिकची झंझट कायमची मिटणार! मरीन ड्राईव्ह ते ऑरेंज गेट फक्त ५ मिनिटांत; मुंबईकरांसाठी मोठी बातमी

SCROLL FOR NEXT