Shivendra Raje On Devendra Fadnavis Saam Tv
महाराष्ट्र

Shivendra Raje News : देवेंद्र फडणवीसांना फडतूस म्हणणं म्हणजे...; शिवेंद्रराजे भोसलेंची जोरदार टीका

Satara News : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत असताना फडतूस शब्दाचा वापर केला होता. यावरून राजकीय वातावरण चांगलेच गरम झाले आहे.

ओंकार कदम

Shivendra Raje On Uddhav Thackeray News : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत असताना फडतूस शब्दाचा वापर केला होता. यावरून राजकीय वातावरण चांगलेच गरम झाले आहे. याबाबत बोलत असताना शिवेंद्रराजे यांनी देवेंद्र फडणवीस यांना फडतूस म्हणणं म्हणजे उद्धव ठाकरेंचा बालिश पणा असल्याची टीका केली आहे. (Latest Marathi News)

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे नेतृत्व महाराष्ट्रामध्ये कार्यक्षम मुख्यमंत्री आणि आता उपमुख्यमंत्री अशी आहे. उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) सत्तेतून बाहेर जावे लागल्यामुळे ते असं बोलत असावेत. देवेंद्र फडणवीस यांच्या सारख्या कर्तव्यदक्ष नेतृत्वाबद्दल अशी वक्तव्य करणे ही दुर्दैवी गोष्ट आहे.

आम्ही सर्व सातारकर या गोष्टीचा निषेध व्यक्त करतो. अशी वक्तव्य थांबवावी आम्ही देखील उत्तर देऊ शकतो परंतु अशी आमची परंपरा नाही त्यामुळे अशी वक्तव्य थांबवावी. तुम्हाला सुद्धा मुख्यमंत्री म्हणून संधी मिळाली होती परंतु त्यावेळी तुमची कुठेही जायची इच्छाशक्ती नव्हती.

त्यामुळेच लोकांनी तुम्हाला नाकारलं तसेच तुमच्या आमदारांनी सुद्धा तुम्हाला नाकारले त्यामुळे दुसऱ्यांना फडतूस म्हणून तुमचा नाकर्तेपणा लपणार नाही अशी खरमरीत टीका आमदार शिवेंद्रराजे भोसले (Shivendra Raje Bhosale) यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Parenting Tips : मुलांना 'ट्यूशन'ला पाठवताय? मग थांबा! लागतील 'या' वाईट सवयी अन् करिअर...

सर्वांच्या नजरा वळतील तुमच्याकडे; सुई-धागा इअररिंग्स, पाहा सोन्यातील ट्रेंडी डिझाइन्स

अशोक खरात प्रकरणात राष्ट्रवादी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; सुनील तटकरेंनी दिली मोठी हिंट

LPG संकटावर सरकारचं मोठं विधान, पर्याय शोधण्याचा जनतेलाच दिला सल्ला

Maharashtra Live News Update: यवतमाळमधील दिग्रस शहरात गारांसह अवकाळी पाऊस

SCROLL FOR NEXT