Nanded Crime News Saam Tv
महाराष्ट्र

Crime News : प्राध्यापिकेची विद्यार्थ्याला लाथा- बुक्यांनी मारहाण, पालकाची शिवाजीनगर पाेलिसांत धाव

दरम्यान या घडलेल्या घटनेची निष्पक्ष चौकशी व्हावी यासाठी महाविद्यालयाने पावले उचलली आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

- संजय सूर्यवंशी

Nanded Crime News : नांदेड (nanded) येथील एका महाविद्यालयात प्राध्यापिका महिलेने विद्यार्थ्याला (student) मारहाण केल्याची घटना नुकतीच घडली. त्यामुळे विद्यार्थ्याच्या पालकांनी प्राध्यापिकेविरुद्ध पाेलिस ठाण्यात धाव घेतली. (Maharashtra News)

संबंधित विद्यार्थ्याने प्राध्यापिकेने कपडे फाटेपर्यंत मारहाण केल्याचे पालकांना सांगितले. त्यानूसार पालकांनी माझ्या मुलाला मारहाण करण्यात आली. तू कसा पास हाेताे हे मी पाहते असा दम भरल्याची तक्रार पाेलिसांत दिली. याबाबतची तक्रार शिवाजीनगर पोलिसांनी नाेंदवून घेतली आहे. प्राध्यापिकेवर एनसी दाखल केली आहे अशी माहिती पाेलिसांनी दिली.

दरम्यान या घडलेल्या घटनेची निष्पक्ष चौकशी व्हावी यासाठी महाविद्यालयाने पावले उचलली आहेत. महाविद्यालयाने त्रीसदस्य समिती नेमली आहे. त्याचा अहवाल आल्यानंतर महाविद्यालय प्रशासन प्राध्यापिकेवर पुढची कारवाई करेल असे स्पष्ट करण्यात आले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eye cancer symptoms: ही लक्षणं दिसू लागली तर समजा डोळ्यांच्या कॅन्सरची होतेय सुरुवात; वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या

Maharashtra Live News Update : लातूरमध्ये पंकजा मुंडेंच्या दोन सभा, हेलिकॉप्टरला तांत्रिक बिघाड झाल्याने सभेला उशीर

Paithani Price: महिलांना झटका! पैठणीची किंमत वाढली; VIDEO

Ajit Pawar Death : दादांची शप्पथ! …तर त्याच्या घरात चिता जाळायला कुणी शिल्लक राहणार नाही, आमदाराचा थेट इशारा

Mumbai Road Trip: लोणावळा-खंडाळा झाले जुने; मुंबईजवळची 8 हिडन ठिकाणं पाहून थक्क व्हाल, पार्टनसोबत रोड ट्रिप करा एन्जॉय

SCROLL FOR NEXT