Shivaji Wategaonkar Warns Gopichand Padalkar Saam
महाराष्ट्र

'तुझे कपडेच काय, तुझीxxx.. सुद्धा ठेवणार नाही'; वाटेगावकरांकडून गोपीचंद पडळकरांना सज्जड दम

Shivaji Wategaonkar: गोपीचंद पडळकरांनी जयंत पाटील यांच्यावर जहरी टीका केली. शिवाजी वाटेगावकरांनी पडळकरांना थेट इशारा देत हल्लाबोल केला.

Bhagyashree Kamble

  • पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका.

  • फडणवीसांनी पडळकरांना वादग्रस्त विधानं टाळण्याचा सल्ला दिला.

  • शिवाजी वाटेगावकर यांनी थेट इशारा देत पडळकरांवर हल्लाबोल केला.

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगलीतील जत विधासभा मतदारसंघात जयंत पाटील यांच्यावर जहरी टीका केली होती. यामुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं. शरद पवारांनी याबाबत देवेंद्र फडणवीसांना फोन करून नाराजी व्यक्त केली. फडणवीसांनी यानंतर पडळकरांना फोन करून सल्ला दिला होता. पडळकरांनी राजाराम बापू यांच्याबद्दलही वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. पडळकरांच्या वादग्रस्त विधानांनंतर बापू बिरू वाटेगावकर यांचा मुलगा शिवाजी वाटेगावकर यांनी थेट त्यांना इशारा देत दम भरला आहे.

शिवाजी वाटेगावकर यांनी पडळकरांच्या विधानांचा समाचार घेतला आहे. 'जयंत पाटलांविरूद्ध तू काहीही बोलतोस. तो व्यक्ती तुला काय आलतू फालतू वाटला काय? तू कधीतरी वाळवा तालुक्यात यायचा विचार कर, तुझे कपडे काढूनच तुला परत पाठवतो. तू जत तालुक्यातून निवडून येऊन दाखव. तुला समाजात काडीहीची किंमत नाही', असं वाटेगावकर म्हणाले.

'धनकर समाजाला त्यानं मान खाली घालायला लावलीय. बापूंसारख्या व्यक्तींवर तू बोलतोस, एवढा मोठा झाला का तू?' असा हल्लाबोल त्यांनी केला. 'वाळवा तालुक्यात तू येऊन दाखव. कपडेच काय तुझी चड्डी सुद्धा ठेवणार नाही', असं म्हणत शिवाजी वाटेगावकर यांनी पडळकरांवर थेट हल्लाबोल केला.

देवेंद्र फडणवीसांनी फोन केल्यानंतर पडळकरांनी प्रतिक्रिया दिली होती. 'मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मला फोन आला होता. अशी वक्तव्य करू नका, अशा पद्धतीची सूचना त्यांनी मला दिलीय. मी त्यांच्या सूचनेचं पालन करतो. देवेंद्र फडणवीस यांनी मला ज्या काही सूचना दिल्या आहेत. त्याचं मी पाळण करेन', असं गोपीचंद पडळकर म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Elections:भाजपला रोखण्यासाठी काका-पुतण्या एकत्र? ठाकरेंपाठोपाठ दोन्ही राष्ट्रवादीचीही युती?

KDMC Election: भाजपा–शिवसेना शिंदे गटकाडून युतीचे संकेत; मात्र जागा वाटपाचा तिढा अजूनही गुलदस्त्यात

Kalyan Politics: फोडाफोडीवरून महायुतीत पुन्हा वाद; शिवसेनेनं नगरसेवक पळवल्यानंतर भाजप आक्रमक

Maharashtra Elections: बायको, मुलगा-मुलगी,भाऊ-बहिणींनाच हवीय उमेदवारी; नेत्यांना फक्त आपल्याच घरात हवं तिकीट

कराडची जामीनासाठी न्यायालयात धाव, सुटकेनंतर समर्थक काढणार हत्तीवरून मिरवणूक?

SCROLL FOR NEXT