Shivajirao Adhalrao-Patil Saam Tv
महाराष्ट्र

Shivaji Adhalrao Patil: 'निवडून आलं की मी निघालो शूटिंगला...'; खासदार कोल्हेंवर आढळरावपाटीलांचा हल्लाबोल

Shivaji Adhalrao Patil On Amol Kolhe: फक्त निवडून आलं की मी निघालो शूटिंगला असं चालत नसतं याचं भाण ठेवायला हवं, असं म्हणत आढळरावपाटीलांनी खासदार अमोल कोल्हेंवर हल्लाबोल केलाय.

रोहिदास गाडगे

Maharashtra Political News:

पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला तत्वतः मंजुरी मिळाली आहे. या प्रकल्पाचे काम लवकरात लवकर व्हावे यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी काही दिवसांपूर्वीच बैठक घेतली होती. त्यावरुन खासदार अमोल कोल्हेंनी हे काम आता लवकरच पूर्ण होणार, असं म्हणत अजित पवारांना चिमटा काढला. कोल्हेंच्या या वक्तव्यावरुन माजी खासदार शिवाजी आढळराव पाटलांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. (Latest Marathi News)

पुणे-नाशिक हायस्पिड रेल्वे प्रकल्पावरुन आढळराव पाटीलांनी खासदार अमोल कोल्हेंना खडेबोल सुनावले आहेत. "जनतेच्या मतावर निवडून येता ते तुम्हाला मोठं होण्यासाठी नाही. लोकांच्या सुखदुःखात सहभागी होऊन लोकांची कामं करावी लागतात. फक्त निवडून आलं की मी निघालो शूटिंगला असं चालत नसतं याचं भाण ठेवायला हवं, असं म्हणत आढळरावपाटीलांनी खासदार अमोल कोल्हेंवर हल्लाबोल केलाय.

यावेळी निधीवरुन अजित पवारांकडून निधी मिळत नव्हता मात्र आता चंद्रकांत पाटलांकडून भरभरुन निधी मिळत असल्याचे सांगत आढळराव पाटलांनी जनतेशी बांधिलकी असल्याची आठवण करुन देत खासदार झालो तर आनंदच, असं म्हटलं आहे. दरम्यान, ज्यांचा प्रचार करण्याचा आदेश येईल त्यांचा प्रचार करणार. असं आढळरावपाटलांनी जाहिर करत पुणे नाशिक हायस्पिड रेल्वे प्रकल्पावरुन कोल्हेंना खडेबोल सुनावले आहेत.

पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला फेब्रुवारी महिन्यातच तत्वतः मंजुरी मिळाली आहे. पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्पाने दोन्ही शहरांच्या विकासाला मोठी चालना मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Mumbai Crime: गार्डमध्ये जाऊन ड्रग्जचं इंजेक्शन घेतलं, मुंबईत तरुणाचा तडफडून मृत्यू

Shadashtak Yog 2026 : ९ ऑक्टोबरपासून धोकादायक योग! ४ राशींवर कोसळणार अडचणींचा डोंगर; तुमची रास तर नाही ना?

जगात पुन्हा लॉकडाऊन लागणार? रशियात लॅबमध्ये 'ती' एक चूक झाली अन् एकाचा मृत्यू; २०० जण क्वारंटाईन

Shreyas Iyer: ‘योग्य वेळ आली की तो राज्य करेल’, वैभव सूर्यवंशीच्या भवितव्याबाबत श्रेयस अय्यरचा मोठा विश्वास

SCROLL FOR NEXT