अकोला: अकोल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे (Sanjay Khadse) यांना गायनाची आवड आहे. ते आपला छंद जोपासत असतात. कोरोना जनजागृती गीतानंतर संजय खडसे यांनी शिवजयंती विशेष गीत गायले आहे. अकोल्यात निवासी उपजिल्हाधिकारी (Resident Deputy Collector, Akola) या पदावर कार्यरत असुन त्यांना गीत गायनाची प्रचंड आवड आहे. यापूर्वी संजय खडसे यांनी त्यांच्या पत्नी नीता खडसे यांनी कोरोना लस जनजागृती गीत गायले होते. तर गायनाच्या कार्यक्रमात संजय खडसे सहभाग नोंदवत असतात. (Shiva song sung by the sanjay khadse Deputy Collector of Akola)
हे देखील पहा -
'माझ्या राजाची जयंती आली,
'शिवरायची जयंती आली'
शिवजयंतीच्या (Shiv Jayanti 2022) पर्वावर छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या कार्यावर आधारित व शिवजयंती उत्सवामध्ये साजरी व्हावी याकरिता 'शिवरायाची जयंती आली' अशाप्रकारचे गीत संगीतबद्ध करून शिवजयंतीच्या पर्वावर समर्पित केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी केल्या जाते. या गीताचे मुकुंद कुमार नितोने यांनी लेखन केले, आणि प्रा. संजय खडसे निवासी उपजिल्हाधिकारी, अकोला यांनी व त्यांच्या पत्नी नीता खडसे यांनी गीत गायले.
महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकणारे गीत लोकांना समर्पित करताना अतिशय आनंद होत आहे, प्रशासकीय कामासोबत गायणाचा छंद आहे. त्याचा समाजात फायदा व्हावा व समाज प्रबोधन व्हावे या करीता गीत तयार करण्यात असल्याचे प्रा. संजय खडसे यांनी सांगितले.
Edited By - Akshay Baisane
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.