Uddhav Thackeray addresses Shiv Sainiks during Shiv Sena’s 60th foundation day event in Mumbai. saam tv
महाराष्ट्र

शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन होणार? उद्धव ठाकरेंनी 60 व्या वर्धापन दिनी जाहीर केली भूमिका

Uddhav Thackeray Statement On Congress Merge: शिवसेनेच्या 60व्या वर्धापन दिनी उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसमध्ये विलीन होण्याच्या चर्चांवर स्पष्ट भूमिका मांडली. खासदारांच्या फुटीनंतरही शिवसैनिक ठाम असल्याचा विश्वास व्यक्त करत विरोधकांवरही निशाणा साधला.

Omkar Sonawane

शिवसेनेला स्थापन होऊन आज 60 वर्षे पूर्ण झाली असून एकनाथ शिंदे यांच्या सेनेचा मेळावा गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये पार पडत आहे. तर ठाकरेसेनेचा सायन येथील षण्मुखानंद सभागृहात पार पडत आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना उद्देशून जोशपूर्ण भाषण करत कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवला. भाषणाच्या सुरुवातीलाच उद्धव ठाकरे यांनी, “जमलेल्या माझ्या हिऱ्यापेक्षा मौल्यवान शिवसैनिकांनो… अशा शब्दांत कार्यकर्त्यांना साद घालत भावनिक संवाद साधला. कोणी माय का लाल हे देणं माझ्यापासून हिरावून घेऊ शकत नाही, असे ठामपणे सांगत त्यांनी शिवसैनिकांच्या निष्ठेवर विश्वास व्यक्त केला.

यावेळी त्यांनी विरोधकांवरही निशाणा साधला. खासदारांच्या फुटीनंतर शिवसैनिक खचला नाही, उलट पेटलेला आहे. ऑपरेशन तुडवाला आदेश द्या असं सांगितलं जातं, पण बाळासाहेबांनी आदेश आधीच दिले आहेत, असे म्हणत त्यांनी त्या 6 खासदारांना इशारा दिला. तसेच ठाकरे यांनी पक्षातील ताकद अधोरेखित करत चार खासदारांचा सत्कार झाला असून आपल्याकडे वीस आमदार आणि अनेक नगरसेवक आहेत, असे सांगितले. तसेच, संकटामागून संकटं आली तरी शिवसैनिक त्यावर मात करणार, असा विश्वास व्यक्त केला.

काँग्रेसमध्ये विलीन होण्याच्या विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले, भाजपसोबत राहूनही आम्ही भाजपत विलीन झालो नाही, तर काँग्रेसमध्ये कसे होणार? निवडणूक निकालांवरून पक्षाच्या यश-अपयशाचे मोजमाप करण्यावरही त्यांनी भाष्य केले. यश-अपयश केवळ निकालांशी जोडायला लागलो, तिथे आपण चुकतो, असे मत त्यांनी व्यक्त केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मिसिंग लिंकवर बोलणं महाराष्ट्राचा अपमान कसा?विरोधात असताना तुम्ही काय केलं? राज ठाकरेंचे फडणवीसांवर हल्लाबोल

Fact Check: राममंदिर चोरीतील कोट्यवधींच्या नोटा सापडल्या? गाडीतील गुप्त कप्यात लपवली कोट्यवधींची रोकड?

Horoscope Today: 'या' ५ राशींसाठी शुक्रवार अत्यंत शुभ, ग्रहांची मिळणार साथ, पैशांचा पडणार पाऊस

Factory Fire: मृत्यूचे तांडव! चप्पल कारखान्यात भीषण आग, २८ जणांचा होरपळून मृत्यू

औषध खरेदीची सक्ती, मेडिकलला सील, अभिनेत्याची तक्रार, एफडीएची धडक कारवाई

SCROLL FOR NEXT