shiv sena uddhav thackeray faction andolan at gokul dudh sangh near kolhapur  saam tv
महाराष्ट्र

Gokul Dudh Sangh : गोकुळ दूध संघ परिसरात पाेलीसांनी ठाकरे गटाचं आंदाेलन काढलं माेडीत, आज साेडलंय उद्या... (पाहा व्हिडिओ)

Siddharth Latkar

- रणजीत माजगावकर

Kolhapur News :

गाईच्या दूध दराला वाढ द्यावी या मागणीसाठी आज (शनिवार) उद्धव ठाकरे शिवसेना गटाने (uddhav thackeray faction andolan in kolhapur) कोल्हापुरातील गोकुळ दूध संघासमोर (gokul dudh sangh news) आंदाेलन सुरु केले आहे. या आंदाेलनाच्या पार्श्वभूमीवर माेठा पाेलीस बंदाेबस्त तैनात करण्यात आला आहे. (Maharashtra News)

यावेळी आक्रमक झालेल्या आंदाेलकांनी गाेकुळच्या व्यवस्थापनाचा आणि संचालक मंडळाच्या विराेधात घाेषणाबाजी करत गाेकुळ संघाकडून शेतक-यांची फसवणुक केली जात असल्याचा आराेप करण्यात आला. यावेळी पाेलीसांनी आंदाेलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. आंदाेलक त्यांच्या भूमिकेशी ठाम राहिले. त्यामुळे पाेलीस आणि आंदाेलक यांच्यात वादावादी झाली. आंदाेलकांनी पाेलीसांवर दडपशाहीचा आराेप केला.

कोल्हापूर जिल्ह्यातील गोकुळ शिरगाव येथील गोकुळ दूध संघाच्या मुख्य कार्यालयासमोर शिवसैनिकांकडून दुधाचे टँकर अडवण्यात येणार हाेते. त्यापूर्वीच दूध संघाने वेळेत बदल करुन टॅंकर आत घेतल्याचे शिवसैनिकांनी नमूद केले. या आंदाेलनाच्या पार्श्वभूमीवर गोकुळ दूध संघाच्या बाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला हाेता.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान आक्रमक आंदाेलकांना पाेलीसांनी ताब्यात घेतले. शिवसेनेचे नेेते संजय पवार म्हणाले शेतक-यांना लुटण्याचे काम गाेकुऴ दूध संघाकडून सुरु आहे. आज तुम्ही टॅंकरची वेळ बदलली मात्र उद्याचे काय असा इशारा देखील पवार यांनी संघास दिला.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Live Updates : पुण्यात भरधाव वेगात असलेल्या डंपरने घेतला तरुणीचा जीव

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याला मिळणार 3000 रुपये? CM शिंदे यांनी केलं मोठं वक्तव्य; वाचा...

IND-W vs PAK-W: You Miss I Hit..! पहिलीच ओव्हर अन् रेणुकाच्या In Swinger वर फेरोजाची दांडी गुल

Trend Shoes In India: शूजच्या या टॉप ब्रँडनी भारतीयांना घातलेय भूरळ, सध्या खूपच आहेत ट्रेंडिंगमध्ये

Ajit Pawar : भाऊबीजेची ओवाळणी मिळेल, पण लाडक्या भावाला विसरू नका; अजित पवार असं का म्हणाले?

SCROLL FOR NEXT