उद्धव ठाकरेंची शिवसेना दुसऱ्यांदा फुटणार असल्याची चर्चा सुरू आहे.  saam tv
महाराष्ट्र

Shivsena UBT : ठाकरेंची शिवसेना दुसऱ्यांदा फुटणार; १४-१६ आमदारही पक्ष सोडणार? आमदारानं नेमकं टायमिंग सांगितलं

Uddhav Thackeray latest news : उद्धव ठाकरेंची शिवसेना लवकरच फुटणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्याचवेळी आमदार कृपाल तुमाने यांनी 'ऑपरेशन'ची नेमकी वेळ सांगितली आहे. यामुळं या चर्चांना बळ मिळालं आहे.

Nandkumar Joshi

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात 'ऑपरेशन टायगर'ची जोरदार चर्चा आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे सात खासदार फुटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शिंदेंचे ऑपरेशन टायगर रोखण्यासाठी उद्धव ठाकरेंनी मुंबईत मातोश्रीवर खासदारांची बैठकही घेतली. ज्याला जायचंय, त्यानं खुशाल जावं, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं. ठाकरे गटाच्या नेत्यांकडून हे वृत्त फेटाळले जात असले तरी, शिंदेसेनेचे आमदार कृपाल तुमाने यांनीच ठाकरेंची शिवसेना कधी फुटणार याची अचूक वेळ सांगितली आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील शिवसेना लवकरच फुटणार असल्याची चर्चा आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाआधीच म्हणजे आठवडाभरात ठाकरे गटाचे खासदार बंड करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याबाबत कुठल्याही पक्षाने अथवा नेत्याने अधिकृत घोषणा केलेली नाही. मात्र, शिंदेसेनेचे आमदार कृपाल तुमाने यांनी उद्धव ठाकरेंचे सात खासदार संसदेच्या पावसाळी अधिवेशनाआधी बंड करू शकतात, असं सांगितले आहे.

उद्धव ठाकरे गटाचे १४ ते १६ आमदार देखील वेगळा निर्णय घेऊ शकतात, असं मीडिया रिपोर्ट्समध्ये सूत्रांच्या हवाल्याने स्पष्ट करण्यात आले आहे. ठाकरे गटात आगामी सहा ते सात दिवसांत मोठी फूट शकते, असेही रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आले आहे. असं झालं तर उद्धव ठाकरेंची शिवसेना दुसऱ्यांदा मोठी फूट पडेल. शिवसेनेचे (शिंदे गट) आमदार कृपाल तुमाने यांनीही याबाबत संकेत दिले आहेत. त्यांनी ऑपरेशन टायगरचा हवाला देत, यासंबंधी गेल्या काही दिवसांपासून बैठका सुरू होत्या. सात खासदारांनी पक्ष बदलण्याचा निर्णय घेतला आहे, असा दावाही तुमाने यांनी केला.

शिवसेना ठाकरे गट कधी फुटणार?

ऑपरेशन टायगर अंतर्गत सात खासदारांशी सुरू असलेली चर्चा अंतिम टप्प्यात आहे. एखाद्या रुग्णालयात ऑपरेशन करायला गेले तर रुग्णाची आधी तपासणी होते. आता तपासणी झाली आहे. अहवाल प्राप्त झाला आहे. आता फक्त ऑपरेशनचा दिवस निश्चित व्हायचा आहे. पावसाळी अधिवेशनाआधी हे ऑपरेशन होईल, असे स्पष्ट संकेत आमदार तुमाने यांनी दिले.

विलीनीकरणाच्या चर्चांवर त्यांनी स्पष्टपणे बोलण्यास नकार दिला. या सर्व आमच्यातल्या गोष्टी आहेत. आताच सगळं काही सांगणं योग्य नाही. ते सर्व आमच्यासोबत येतील हे निश्चित आहे. आमच्या पक्षात ते जवळपास आलेलेच आहेत, असंही ते म्हणाले.

शिवसेना उद्धव ठाकरे गटात फूट का पडणार आहे, याबाबत विचारणा केली. त्यावर त्यांच्या पक्षात नेमकं काय चाललंय हे माहीत नाही. हे तर तेच लोक सांगू शकतात. मात्र, शिंदेंची जी कामाची पद्धत आहे, ज्या पद्धतीने ते सर्वसामान्यांना न्याय देण्याचं काम करतात, त्यांची ती कामाची पद्धत सगळ्यांना आवडते. त्यांच्या मतदारांची कामे झाली पाहिजेत, विकास झाला पाहिजे, असेही त्यांना वाटते. त्यामुळे ते आमच्यासोबत येत आहेत, असे तुमाने यांनी 'एएनआय'ला सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: छत्रपती संभाजीनगर : आगीतून वाचवले; पण जुळ्या चिमुकल्यांना नियतीने हिरावले

Zodiac Personality Traits: ४ राशींच्या व्यक्तींकडे असतो पैसाच पैसा; कुबेरासारखं असतं नशीब, कधीच येत नाही आर्थिक चणचण

Skin Care : स्किन ग्लोसाठी महागडे प्रोडक्ट्स कशाला फक्त झोप आहे गरजेची; किती तासांची झोप देईल चेहऱ्यावर ग्लो

Monday Horoscope: आजचा दिवस ठरवेल तुमचं नशीब! या 5 राशींना मिळणार मोठी खुशखबर; सोमवारचे खास राशीभविष्य

Bigg Boss 20: बादशाहसोबत डिव्होर्सनंतर ईशा रिखीची 'बिग बॉस २०'मध्ये एन्ट्री; म्हणाली, 'प्रेक्षकांना लवकरच सत्य...'

SCROLL FOR NEXT