Ramdas Kadam Saam TV Marathi News
महाराष्ट्र

Maharashtra politics : योगेश कदमांनी बापाच्या उद्योगांची चौकशी करावी, अनिल परब यांचा हल्लाबोल

Anil Parab press conference highlights : अनिल परब यांनी रामदास कदम यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देत पत्रकार परिषदेत जोरदार हल्लाबोल केला. १९९३ मध्ये ज्योती कदम यांच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी मागणी केली. तसेच गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी आपल्या बापाच्या उद्योगांची चौकशी करावी, असे आव्हानही परब यांनी दिले.

Namdeo Kumbhar

संजय गडदे, मुंबई प्रतिनिधी

Shiv Sena UBT Anil Parab On Ramdas Kadam : शिंदेसेनेच्या रामदास कदम यांनी दसरा मेळाव्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूविषयी सनसनाटी दावा केला होता. यावर ठाकरेंच्या शिवसेनेच्या अनिल परब यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. बाळासाहेब ठाकरेंच्या मृत्यू प्रकरणात संशय व्यक्त करणाऱ्या कदमांची नार्को टेस्ट झालीच पाहिजे, लोकांसमोर सत्य यायलाच हवं. पण यासोबत माझीही एक मागणी आहे. १९९३ मध्ये ज्योती रामदास कमद यांनी जाळून घेतलं की जाळलं.. याचीही चौकशी व्हायला हवीच. खेडमध्ये रामदास कदमांनी कुणाला बंगले बांधून दिले, त्यावरुन काय राजकारण झाले, हे सर्वांनाच माहिती आहे. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी आपल्या बापाच्या उद्योगांची चौकशी करावी, असे आव्हान अनिल परब यांनी दिले. (Anil Parab press conference highlights)

शिवसेना नेते अनिल परब यांनी आज पत्रकार परिषद घेऊन रामदास कदम व त्यांच्या कुटुंबावर थेट गंभीर आरोपांचा भडीमार केला. दसरा मेळाव्यात झालेल्या वक्तव्यांवर प्रतिक्रिया देताना परब म्हणाले की, “मुलींना नाचवून भाडं खाणाऱ्या आणि दलाली करणाऱ्यांना उत्तर देण्याची गरज नाही, पण आमचे दैवत असलेल्या बाळासाहेबांच्या मृत्यूबाबत प्रश्न उपस्थित झाल्याने उत्तर द्यावं लागतं.” परब यांनी दावा केला की, बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्युपत्राची तयारी त्यांनीच केली असून, “मेलेल्या माणसाचे ठसे काही उपयोगी नसतात. बाळासाहेबांनी हयातीतच हातांचे मोल्ड बनवले होते,” असे त्यांनी स्पष्ट केले.

याच वेळी परब यांनी 1993 मध्ये रामदास कदम यांच्या पत्नी ज्योती कदम यांच्या मृत्यूचा मुद्दाही उपस्थित केला. “त्यांनी आत्महत्या केली की त्यांनी स्वतःला जाळून घेतलं की त्यांना कुणी जाळलं? त्यामागे काही दुसरं कारण होतं, हे नार्को टेस्टमध्ये समोर यायला पाहिजे. गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी या प्रकरणी चौकशी केली पाहिजे,” अशी मागणी त्यांनी केली.

रामदास कदम यांच्यावर डान्सबार, वाळू चोरी, जमिनी बळकावणे, दादागिरी, घरातील आत्महत्यांचे प्रश्न उभे करून परब यांनी हिवाळी अधिवेशनात पुराव्यासकट आवाज उठवण्याचा इशारा दिला. “मी कोर्टात अब्रूनुकसानीचा दावा दाखल करणार आहे. त्यांनी माफी मागितली नाही तर कोर्टात जावं लागेल,” असेही ते म्हणाले. परब यांनी पुढे थेट आव्हान दिले – “रामदास कदम आणि माझी दोघांची नार्को टेस्ट झाली पाहिजे. सत्य जनतेसमोर यावंच लागेल. कदम कुटुंबाने केलेले शंभर अपराध लोकांना ठाऊक आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नांपासून लक्ष विचलित करण्यासाठी हा मुद्दा उचलला जातोय, पण जनता खरी ओळख पटवून देईल.” या आरोप-प्रत्यारोपातून नागपूरमध्ये होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात राजकीय वादळ उठणार, हे निश्चित झालं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mawa Barfi Recipe : फक्त ४ पदार्थांपासून बनवा स्वादिष्ट मावा बर्फी, तोंडात टाकताच विरघळेल

Ram Sutar : शिल्पकलेतील भीष्माचार्य काळाच्या काळाच्या पडद्याआड, राम सुतार यांचं निधन

Accident : आईसमोरच मुलीचा मृत्यू! शिकवणीला जाताना विद्यार्थिनीला ट्रकची धडक; वर्ध्यात खळबळ

Famous Actor Father Death : बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्याला पितृशोक, वडिलांच्या आठवणीत केली भावुक पोस्ट

Walking: वजन कमी करण्यासाठी खूप चालताय का? पण या ७ चुका टाळा; अन्यथा...

SCROLL FOR NEXT