Shreya Maskar
मावा बर्फी बनवण्यासाठी मावा, साखर, वेलची पावडर, ड्रायफ्रूट्स इत्यादी साहित्य लागते. या सर्वांचे योग्य प्रमाण घ्या.
मावा बर्फी बनवण्यासाठी सर्वप्रथम पॅनमध्ये तूप टाकून मावा चांगला गोल्डन फ्राय होईपर्यंत परतून घ्या. गॅस मंद आचेवर ठेवून द्या.
मावा चांगला परतून झाल्यावर त्यात साखर पूर्णपणे विरघळेपर्यंत ढवळत राहा. तुम्ही यात बारीक साखरेचा वापर करा.
मिश्रण थोडे घट्ट झाल्यावर त्यात वेलची पावडर मिसळा. यामुळे मावा बर्फीला एक वेगळा स्वाद आणि चव येते.
त्यानंतर एका बाऊलमध्ये तुमचे आवडते ड्रायफ्रूट्स बारीक कापून घ्या. त्यानंतर ते तयार मिश्रणात टाकून चांगले मिक्स करा.
एका ट्रेला तूप लावून त्यात मावा बर्फीचे मिश्रण पसरवून घ्या. त्यानंतर त्याचे समान काप करा.
शेवटी मावा बर्फीवर कापलेले ड्रायफ्रूट्स टाकून चांगले समवून घ्या. तुम्ही यात काजू, बदाम, पिस्ता आणि अक्रोड टाकू शकता.
मावा बर्फीचे फ्रिजमध्ये सेट करायला 1-2 तास ठेवून द्या. त्यानंतर एका बाऊलमध्ये काढून मावा बर्फीचा आस्वाद घ्या. तोंडात टाकताच मावा बर्फी विरघळेल.