Shiv Sena Supreme Court Hearing Today Live Update :  Saam TV
महाराष्ट्र

Shiv Sena SC Case Live : भाजपाला वेगळा अन् ठाकरेंना वेगळा न्याय?, कपिल सिब्बल यांनी दाखवली आयोगाची दुटप्पी भूमिका

Shiv Sena Supreme Court Hearing Today Live Update : शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे गटाला देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला उद्धव ठाकरे गटाने आव्हान दिले आहे. या याचिकेसह आमदारांच्या अपात्रतेच्या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.

Namdeo Kumbhar

Shiv Sena Party Symbol Hearing LIVE Updates : सिब्बल यांचा तिहेरी रणनीतीतून प्रहार

सुनावणीदरम्यान कपिल सिब्बल यांनी अत्यंत चतुराईने तीन वेगवेगळ्या स्तरांवर युक्तिवाद मांडला. त्यांनी घटनात्मक (Constitutional) नियमांचा हवाला देत निवडणूक आयोगाच्या अधिकारांवर प्रश्न उपस्थित केले; तथ्यपूर्ण (Factual) दाखले देत अपात्रतेची प्रक्रिया कशी डावलली गेली हे दाखवून दिले; आणि भावनिक (Emotional) पातळीवर लोकशाहीच्या अस्तित्वाचा प्रश्न उपस्थित करून कोर्टाचे लक्ष वेधले.

Shiv Sena Supreme Court Hearing Today Live Update : 'हा निकाल देशाच्या लोकशाहीसाठी ऐतिहासिक ठरेल'

सुप्रीम कोर्टाला या खटल्याच्या निमित्ताने कायद्याचे राज्य (Rule of Law) टिकवून ठेवण्याची मोठी संधी असल्याचे सिब्बल म्हणाले. "हा लँडमार्क खटला असून सुप्रीम कोर्टाचा हा निकाल केवळ एका पक्षापुरता मर्यादित राहणार नाही, तर भविष्यातील सर्व पक्षफुटीच्या प्रकरणांसाठी दिशादर्शक ठरेल. जर अशा प्रकारे विधिमंडळातील फुटीच्या जोरावर मूळ राजकीय पक्षच ताब्यात घेण्याला मान्यता मिळाली, तर निवडणूक प्रक्रिया, राजकीय पक्षांची घटना आणि जनतेच्या कौलाला काहीच अर्थ उरणार नाही," असा गंभीर इशारा सिब्बल यांनी कोर्टाला दिला.

Shiv Sena Supreme Court Hearing Today Live Update : आमदार अपात्रता अन् पक्षचिन्हाचा गुंता: 

युक्तिवादादरम्यान कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांच्या परस्परविरोधी भूमिकेवर बोट ठेवले. निवडणूक आयोगाने विधिमंडळातील २/३ बहुमताचा आधार घेत पक्ष आणि चिन्ह शिंदे गटाला दिले, तर दुसरीकडे विधानसभा अध्यक्षांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयाचा हवाला देत अपात्रतेचा निर्णय दिला. सिब्बल यांनी सवाल केला की, हे दोन्ही निर्णय एकमेकांवर अवलंबून असताना अशा प्रकारे चक्रव्यूह तयार करून अपात्रतेची टांगती तलवार असणाऱ्या व्यक्तीला मुख्यमंत्री पद भूषवू देणे योग्य आहे का?

Shiv Sena Supreme Court Hearing Today Live Update : अपात्र होणाऱ्या व्यक्तीला मुख्यमंत्री कसं केलं? कपिल सिब्बल आक्रमक; आयोगासह अध्यक्षांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

भविष्यात अपात्र ठरू शकणाऱ्या व्यक्तीला थेट मुख्यमंत्री पदावर कसं बसू दिलं? आमदारांची अपात्रता आणि निवडणूक आयोगाचा पक्ष-चिन्हाबाबतचा निर्णय हे दोन्ही एकमेकांवर अवलंबून आहेत. जर आमदारच अपात्र ठरले, तर निवडणूक आयोगाने दिलेला धनुष्यबाण चिन्हाचा निर्णय पूर्णपणे निरर्थक ठरेल," असा थेट आणि अत्यंत घणाघाती वार ठाकरे गटाचे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयात केला.

शिवसेना पक्षनाव, धनुष्यबाण चिन्ह आणि आमदारांच्या अपात्रतेच्या प्रकरणात सरन्यायाधीश सूर्य कांत यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर सुनावणी सुरू असताना, कपिल सिब्बल यांनी घटनात्मक, तथ्यपूर्ण आणि भावनिक अशा तिन्ही पातळ्यांवर जोरदार युक्तिवाद करत निवडणूक आयोग, शिंदे गट आणि विधानसभा अध्यक्षांना एकाच वेळी खिंडीत गाठले.

'कायद्याचं राज्य टिकवण्याची कोर्टाला संधी' Kapil Sibal on Shivsena Hearing

Shiv Sena Supreme Court Hearing Today Live Update : भाजपच्या जुन्या भूमिकेचा दाखला देत सिब्बल आक्रमक 

भाजपच्या प्रकरणात निवडणूक आयोगाने स्वतः म्हटलं होतं की पक्षाची अंतर्गत घटना किंवा कायदे बदलले तरी आयोग पक्षाची नोंदणी रद्द करू शकत नाही. अथवा त्यात थेट हस्तक्षेप करू शकत नाही.

जर निवडणूक आयोगाला स्वतःच्याच नियमांनुसार पक्षाची घटना योग्य की अयोग्य ठरवण्याचा किंवा नोंदणी रद्द करण्याचा अधिकार नव्हता, तर मग शिवसेनेच्या बाबतीत २०१८ ची घटना लोकशाहीविरोधी ठरवून धनुष्यबाण चिन्ह आणि पक्ष दुसऱ्या गटाला देण्याचा निर्णय आयोगाने कोणत्या आधारावर घेतला? असा युक्तिवाद सिब्बल यांनी केला.

Shiv Sena Supreme Court Hearing Today Live Update : भाजपाला वेगळा अन् ठाकरेंना वेगळा न्याय?, कपिल सिब्बल यांनी दाखवली आयोगाची दुटप्पी भूमिका

Sibal - In BJP's case, ECI took a stance that it does not have power under S.29A to de-register a registered political party for having violated constitutional provisions.

कपिल सिब्बल - भाजपच्या (BJP) एका प्रकरणात निवडणूक आयोगाने स्वतःच अशी भूमिका घेतली होती की, एखाद्या राजकीय पक्षाने संविधानातील किंवा घटनेतील तरतुदींचे उल्लंघन केले, तरी लोकप्रतिनिधी कायद्याच्या 'कलम २९ अ' (Section 29A) अंतर्गत त्या पक्षाची नोंदणी रद्द (De-register) करण्याचा अधिकार निवडणूक आयोगाकडे नाही.

Shiv Sena Supreme Court Hearing Today Live Update : 'आयोगानं सरसकट पक्ष, चिन्ह शिंदेंना दिलं' Kapil Sibal on Shivsena Hearing

Shiv Sena Supreme Court Hearing Today Live Update : लोकशाही टिकवणे कोणा एकाचे काम नाही, सिब्बलांना कोर्टानं काय उत्तर दिले?

ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल:

या देशात कायद्याचे राज्य (Rule of Law) टिकवून ठेवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडे ही एक मोठी संधी आहे. केवळ तुम्हीच (सर्वोच्च न्यायालय) लोकशाहीचे रक्षण करू शकता. संसद नवे कायदे करत राहील, पण त्या कायद्यांची खरी परीक्षा याच न्यायालयात होणार आहे. सत्ताधारी पक्ष मग तो कोणताही असो, अपात्रतेच्या याचिकांवर कधीही निर्णय होऊ नये, असाच प्रयत्न नेहमी करत असतो.

न्यायमूर्ती बागची:

लोकशाहीचे रक्षण करणे ही केवळ न्यायालयाची नाही, तर आपल्या सर्वांचीच सामूहिक जबाबदारी (Collective Responsibility) आहे.

Shiv Sena Supreme Court Hearing Today Live Update : अपात्रतेचा काळ विधानसभेपुरताच, पण चिन्ह कायम राहते, सर्वोच्च न्यायालयात खडाजंगी

न्यायमूर्ती बागची:

हा काही लोकप्रतिनिधी कायद्याअंतर्गत (RP Act) भ्रष्ट आचारासारखा (Corrupt Practice) गुन्हा नाही. ही मुख्यत्वे १० व्या अनुसूचीच्या (पक्षांतरबंदी कायदा) कामकाजातील अडचण आहे. या न्यायालयाने आपल्या पहिल्या निर्णयात असे म्हटले आहे की, अध्यक्षांना आधीच कारवाई करण्याचे निर्देश दिले जाऊ शकत नाहीत.

कपिल सिब्बल:

पण आता न्यायमूर्ती नरिमन यांचा निकाल याच्या अगदी उलट आहे.

न्यायमूर्ती बागची:

परंतु 'Kihoto' प्रकरणाचा विचार करता, न्यायमूर्तींनी हे प्रकरण मोठ्या खंडपीठाकडे पाठवले आहे.

कपिल सिब्बल:

पण 'सुभाष देसाई' प्रकरणाच्या निकालात अध्यक्षांना 'लवाद' (Tribunal) मानले गेले आहे, त्यामुळे आता हा मुद्दा स्पष्ट झाला आहे.

न्यायमूर्ती बागची:

अपात्रता ही विधानसभेचा कार्यकाळ संपण्यासोबत संपते. परंतु पक्षाचे चिन्ह (Symbol) हे राजकीय पक्ष आहे तोपर्यंत कायम राहते. घटनांची गोठवण (Freezing of facts)... 'राणा' प्रकरणानुसार, अपात्रतेपूर्वी घडलेल्या घटनाच संबंधित आणि महत्त्वाच्या मानल्या जातील.

कपिल सिब्बल:

ते (राणा प्रकरणातील विधान) पक्षातील 'फुटी'वर (Split) लागू होते, आमदारांच्या 'अपात्रतेवर' (Disqualification) नाही.

Shiv Sena Supreme Court Hearing Today Live Update : पहिल्या दिवशी काय घडलं तेच महत्त्वाचं!, सिब्बल यांच्या 'या' एका युक्तिवादाने शिंदे गटाची अडचण वाढली?

Shiv Sena Supreme Court Hearing Today Live Update :

बीएसपी प्रकरणात सुरुवातीला १३ आमदार बाहेर पडले आणि नंतर हळूहळू ही संख्या वाढवून ३७ (आवश्यक १/३ संख्याबळ) झाली. अध्यक्षांनी नंतर त्याला मान्यता दिली होती. पण सुप्रीम कोर्टाने स्पष्ट सांगितले होते की, पहिल्या दिवशी काय घडले तेच महत्त्वाचे असते. नंतर हळूहळू संख्या वाढवून फुटीला कायदेशीर स्वरूप देता येत नाही, असे सिब्बल यांनी कोर्टात युक्तिवाद केला.

१० व्या अनुसूचीचा (पक्षांतरबंदी कायदा) मूळ उद्देश पक्षांतर रोखणे हा आहे, पक्षांतराला किंवा गद्दारीला मान्यता देणे हा नाही. तुम्ही ज्या दिवशी अध्यक्ष किंवा निवडणूक आयोगाकडे तक्रार घेऊन जाता, त्या आदल्या दिवशीची परिस्थिती काय होती, हेच न्यायालयात विचारात घेतले पाहिजे, असेही सिब्बल म्हणाले.

या प्रकरणात अपात्रतेचा अर्ज दाखल झाला, पण अध्यक्षांनी निर्णय प्रलंबित ठेवला. परिस्थिती बदलू दिली, स्वतः मुख्यमंत्री झाले आणि मग निवडणूक आयोगाकडे गेले, असाही युक्तिवाद त्यांनी केला.

Shiv Sena Supreme Court Hearing Today Live Update : 'धनुष्यबाण' चिन्ह शिंदेंना देणे बेकायदेशीर? सर्वोच्च न्यायालयात ठाकरेंच्या वकिलांचा थेट निवडणूक आयोगावर प्रहार

जनता दलाचा निर्णय वास्तविक आमच्या बाजूने आहे, पण निवडणूक आयोगाने आम्हाला कोणतीही पूर्वसूचना न देता शिंदे गटाला फायदा पोहचवण्यासाठी तो आमच्याविरोधात वापरला, असा युक्तिवाद सिब्बल यांनी कोर्टात केला. पक्षाची घटना लोकशाहीविरोधी आहे की नाही, हे ठरवण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला अजिबात नाही. जर पक्षाच्या घटनेनुसार एखाद्या सदस्याला बाहेर काढले, तर तो निवडणूक आयोगाकडे नाही, तर दिवाणी न्यायालयात (Civil Court) जातो.

समजा आयोगाला अधिकार आहेत असे मानले, तरी आयोग फक्त 'घटना सुधारा' असा सल्ला किंवा आदेश देऊ शकतो; पण थेट पक्षाचे 'धनुष्यबाण' चिन्ह काढून दुसऱ्या गटाला देऊ शकत नाही, असे सिब्बल म्हणाले.

Shiv Sena Supreme Court Hearing Today Live Update : निवडणूक आयोगाची ती घोडचूक! कपिल सिब्बल यांनी सुप्रीम कोर्टात उघड केला तो 'मोठा घोळ'

शिवसेना पक्षनाव आणि पक्षचिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीशांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरू असताना, ठाकरे गटाचे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद करताना निवडणूक आयोगाच्या निर्णयावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. निवडणूक आयोगाने शिवसेनेबाबत निर्णय देताना 'जनता दला'तील फुटीचा दाखला देणे ही अत्यंत गंभीर आणि मोठी 'घोडचूक' असल्याचे त्यांनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले.

कपिल सिब्बल यांनी स्पष्ट केले की, शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीवर कोणत्याही गटाने आक्षेप घेतला नव्हता. मग अशा वेळी जनता दलातील फुटीचा आणि एस. आर. बोम्मई केसचा संदर्भ देणे हे पूर्णपणे अयोग्य आहे. जनता दलाच्या प्रकरणाचे कोणतेही ठोस रेकॉर्ड उपलब्ध नसताना, आयोगाने त्याच केसवर अवलंबून राहून ठाकरेंच्या विरोधात निर्णय दिला. दोन्ही प्रकरणांमधील तांत्रिक भिन्नता समोर आणत सिब्बल यांनी निवडणूक आयोगाने दिलेला हा निर्णय कसा चुकीचा होता, हे मुद्द्यांसह सिद्ध करण्याचा प्रयत्न केला.

Shiv Sena Supreme Court Hearing Today Live Update : एकनाथ शिंदेंची नियुक्ती पक्षाच्या घटनेनुसारच झाली, मग अचानक 2018 ची घटना लोकशाहीविरोधी कशी ठरली?  कपिल सिब्बल यांचा हल्लाबोल

ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल :

एकनाथ शिंदे यांची नियुक्ती पक्षाच्या घटनेनुसारच (Party Constitution) करण्यात आली होती. मग अचानक ते १९९९ च्या घटनेबद्दल बोलू लागतात आणि २०१८ मधील सुधारित घटना ही लोकशाहीविरोधी होती, असा शोध लावला जातो?

निवडणूक आयोगाचा हा निर्णय पाहता पक्षाची नोंदणी रद्द करणे (De-register) हाच एकमेव पर्याय उरतो, हे मान्य करण्यासारखे आहे. मी त्याच मुद्द्याकडे येत होतो. निवडणूक आयोग स्वतः म्हणतो की, 'होय, मी ते मान्य करतो, पण मी तरी यात काय करू शकतो?'

Shiv Sena Party Symbol Hearing LIVE Updates : जनता दलाच्या दाखल्यावरून सर्वोच्च न्यायालयात नवा ट्विस्ट! ठाकरेंच्या वकिलांनी कोर्टात असा कोणता पुरावा मांडला?

ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल :

निवडणूक आयोगाने (ECI) निर्णय देताना 'जनता दल' वादातील पूर्वीच्या निर्णयाचा संदर्भ दिला आहे. परिच्छेद २८ पाहा. त्यात अर्जदार गट हा जॉर्ज फर्नांडिस यांचा होता. त्यावेळी एस. आर. बोम्मई हे पक्षाचे अध्यक्ष असणे बंद झालेले नव्हते, ही गोष्ट तिथे स्पष्ट नमूद करण्यात आली होती. निवडणूक आयोगाने त्यावेळी असे म्हटले होते की अर्जदार गटासाठी असा दावा करणे आता खूप उशीर झाला आहे... हा निर्णय थेट आमच्या प्रकरणाशी जुळणारा (लागू होणारा) आहे. निवडणूक आयोग त्यावरच अवलंबून आहे, परंतु निकाल मात्र आमच्याविरोधात दिला आहे."

न्यायमूर्ती बागची: आम्हाला घटना ज्या क्रमाने घडत गेल्या, ते पाहावे लागेल.

कपिल सिब्बल: तीच कसोटी (टेस्ट) प्रत्यक्षात फेटाळण्यात आली आहे. हे मी सिद्ध करून दाखवतो. तो (जनता दलाचा) निर्णय संघटनात्मक बहुमतावर आधारित होता.

Shiv Sena Party Symbol Hearing LIVE Updates :

युक्तिवादाला सुरूवात

ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल आज युक्तिवाद करणार आहेत. आमदार अपात्रेवर सिब्बल आज युक्तिवाद करणार आहे. त्यांचा आज युक्तिवाद संपल्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेकडूनही आज युक्तिवाद होईल, अशी शक्यता आहे.

Shiv Sena Party Symbol Hearing LIVE Updates : शिवसेना कुणाची? सर्वोच्च न्यायालयात सुनावणीला सुरूवात 

सर्वोच्च न्यायालयात सुनावणीला सुरूवात झाली आहे. ठाकरेंकडून कपिल सिब्बल युक्तिवाद करत आहेत. आज त्यांचा युक्तिवाद पूर्ण होणार असल्याचे समजतेय. त्यानंतर शिंदेंच्या वकिलांकडून युक्तिवाद केला जाईल.

Shiv Sena Party Symbol Hearing LIVE Updates : थोड्याच वेळात सुनावणीला होणार सुरूवात

शिवसेना कुणाची? धनुष्यबाण कुणाचा? यावर आज पुन्हा एकदा सुनावणी होणार आहे. ठाकरेंकडून कपिल सिब्बल आज पुन्हा युक्तिवाद करणार आहेत. त्यांचा आज युक्तिवाद संपणार आहे. त्यानंतर शिंदेंच्या वकिलांकडून युक्तिवाद होणार आहे.

Shiv Sena Party Symbol Hearing LIVE Updates : ठाकरेंना धनुष्यबाण अन् 'शिवसेना' नाव परत मिळणार? सर्वोच्च न्यायालयात थोड्याच वेळात सुनावणी; शिंदे गटाचे टेन्शन वाढले!

निवडणूक आयोगाने (ECI) एकनाथ शिंदे यांच्या गटाला अधिकृत 'शिवसेना' म्हणून मान्यता दिली आणि त्यांना 'धनुष्यबाण' हे चिन्ह वापरण्याची परवानगी दिली. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाला आव्हान देणाऱ्या आणि उद्धव ठाकरे यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय लवकरच सुनावणी करणार आहे.

यासोबतच, १० व्या अनुसूचीअंतर्गत (पक्षंतरबंदी कायदा) शिंदे गटाच्या आमदारांना अपात्र ठरवण्यास महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षांनी नकार दिल्याच्या निर्णयाला आव्हान देणारी, ठाकरेंच्या (UBT) गटाचे सदस्य सुनील प्रभू यांची याचिका देखील सुनावणीसाठी सूचीबद्ध करण्यात आली आहे.

खंडपीठ: सरन्यायाधीश (CJI) सूर्यकांत, न्यायमूर्ती जोयमाल्या बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नंदुरबारमध्ये दरड कोसळून बीएलओ गंभीर जखमी; पायावर शस्त्रक्रिया

Indian National Flag: या 4 टप्प्यात करा तिरंग्याची घडी; राष्ट्रध्वजाचा अपमान टाळण्यासाठी प्रत्येकाने ही पद्धत जाणून घेणं गरजेचं

Dagdusheth Ganpati: फरासखाना, विश्रामबाग पोलिसांची जागा दगडूशेठ ट्रस्टला? पुणे पोलिसांकडून अटींसह हिरवा कंदील

घोटाळ्या प्रकरणी गिरीश महाजनांच्या नातेवाईकाला अटक; महाराष्ट्रात खळबळ

श्रावण महिन्यात लग्न करावे की नाही? 5 कारणं वाचून थक्क व्हाल

SCROLL FOR NEXT