Attack on Shiv Sena Leader in Solapur Saam
महाराष्ट्र

शिंदे सेनेच्या नेत्यावर प्राणघातक हल्ला, करमाळ्यातील शेतात मारलं, संशयाची सुई कुणाकडे?

Attack on Shiv Sena Leader in Solapur: सोलापूरातील करमाळ्यात शिवसेना शिंदे गटातील महेश चिवटे यांच्यावर हल्ला. हिवरवाडी येथील शेतात गेल्यावर हल्ला झाल्याची माहिती समोर.

Bhagyashree Kamble

  • शिंदे सेनेचे नेते महेश चिवटेंवर हल्ला.

  • शेतात गेल्यावर हल्ला झाला.

  • करमाळ्यातील रूग्णालयात उपचार सुरू.

सोलापुरातील करमाळ्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. शिवसेना पंढरपूर विभाग जिल्हाप्रमुख (शिंदे गट) महेश चिवटे यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. हा हल्ला सकाळी झाला असल्याची माहिती आहे. हल्ला झाल्यानंतर पोलीस निरीक्षक रणजीत माने घटनास्थळी दाखल झाले असून, घटनेचा तपास पोलिसांकडून सुरूआहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महेश चिवटे हे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वीय सहाय्यक मंगेश चिवटे यांचे ज्येष्ठ बंधू असल्याची माहिती आहे. करमाळा तालुक्यातील हिवरवाडी येथे सकाळच्या सुमारास या हल्ल्याची घटना घडली. महेश चिवटे शेतात गेल्यावर त्यांच्यावर हल्ला झाला.

हल्ला झाल्यानंतर परिसरात खळबळ उडाली. या घटनेनंतर पोलीस निरीक्षक रणजीत माने घटनास्थळी दाखल झाले. या घटनेचा अधिक तपास सध्या पोलिसांकडून सुरू आहे. यानंतर चिवटे यांना करमाळा उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले. आपल्यावर करण्यात आलेला हल्ला कट आणि सुडापोटी करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. चिवटे यांच्यावर झालेला हल्ला आणि गंभीर आरोपांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Toranmal Hill Station : खानदेशचे सौंदर्य! तोरणमाळला दाट धुक्याची चादर,निसर्ग सौंदर्य अनुभवण्यासाठी पर्यटकांची गर्दी

Maharashtra Politics: रायगडमध्ये शिवसेनेला दे धक्का, भाजपने उद्धव ठाकरेंच्या जवळचा शिलेदार फोडला

Shocking: राजधानी पुन्हा हादरली! इन्स्टावरील मित्राने रचलं भयानक कांड, महिला डॉक्टरवर बलात्कार

PM Kisan Yojana: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! हे काम कराच, अन्यथा मिळणार नाही पीएम किसानचे ₹२०००

मर्यादा ओलांडल्या! भाजप नेत्याने शेतकर्‍याला कारखाली चिरडून मारले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले

SCROLL FOR NEXT