Cm Eknath Shinde and Gulabrao Patil Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: अजितदादानंतर शिंदेंच्याही हालचाली, 25 उमेदवार ठरले, 2 दिवसात यादी जाहीर होणार?

Satish Kengar

संजय महाजन, साम टीव्ही, प्रतिनिधी

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सगळेच पक्ष कामाला लागले आहेत. याचदरम्यान अजित पवार गटाने 25 उमेदवारांची नावं फायनल केल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत बैठकीत ही नावं फायनल झाली असल्याचं सांगण्यात येत आहे. यातच आता शिंदे गटाबद्दलही मोठी अपडेट समोर आली आहे.

अजित पवार गटाची उमेदवारांच्या नावाची यादी फायनल झाल्याची बातमी समोर आल्यानंतर शिंदे गटाचे नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले आहेत की, ''आमच्या देखील 25 उमेदवारांची यादी जवळपास फायनल होण्यामध्ये आलेली आहे. ती यादी सुद्धा आमचे नेते एकनाथ शिंदे लवकरच जाहीर करतील.''

ते म्हणाले, ''एक-दोन दिवसांमध्ये आमची सुद्धा यादी जाहीर होईल, असा अंदाज आहे. लोकसभेच्या पद्धतीने जागांचा तिढा महायुतीत राहिला, तसा विधानसभेत होणार नाही. ती काळजी महायुतीतील तिन्ही नेते घेत आहेत. यात वाद होऊ नये आणि जो विलंब लागतो, तसं होऊ नये. ज्या जो उमेदवार निवडून, त्यालाच उमेदवारी देण्यात येईल, असे निश्चित असेल. ज्या ठिकाणी ज्या पक्षाची शक्ती आहे, त्या जागा लवकर जाहीर करून, कामाला लावावं.''

गुलाबराव पाटील पुढे म्हणाले, ''चौकटीत राहून उमेदवार पुढचा कामे करत असतो.'' अजित पवार यांच्याबद्दल बोलताना ते म्हणाले, ''बारामती हा अजित पवार यांचे होम ग्राउंड आहे. गेल्यावेळी त्यांचं मताधिक्य आहे. जवळपास सव्वा लाख मतांचा होतं. लोकसभेत वेगवेगळे खोटे नॅरेटिव्ह पसरवण्यात आले. पण लोकसभा आणि इतर विधानसभा नगरपालिका या निवडणुका या वेगवेगळ्या असतात.''

ते म्हणाले, ''पक्षांमधून व्यक्तीलाही तितका स्थान असतं. बरेच दिवस अजितदादा यांनी तिथला प्रतिनिधित्व केलेलं आहे. साहजिकच ते बारामतीमधून लढतील, असा आम्हाला देखील वाटत होतं.''

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Riteish-Genelia: महाराष्ट्राचे लाडके दादा-वहिनी एकमेकांना कोणत्या नावाने हाक मारतात? वाचून तुम्हीही लावाल डोक्याला हात

Budh-sharni Gochar: शनी-बुधाने बनवला अद्भुत संयोग; 'या' राशींना मिळू शकतो आर्थिक फायदा

Maharashtra News Live Updates: पुण्यात काँग्रेसने राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ आंदोलन

Salman Khan: 'भाईजान'च्या जीवाला धोका? अज्ञात व्यक्तीने सुरक्षा ताफ्यात घुसण्याचा केला प्रयत्न; पोलिसांनी ठोकल्या बेड्या

IPS Shivdeep Lande Resign : आयपीएस शिवदीप लांडे यांनी अचानक दिला राजीनामा; फेसबुकवर पोस्ट करत सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT