Amit Shah Wants 4 Maharashtra Ministers Dropped Saam Tv News
महाराष्ट्र

Maharashtra Politics: अजित पवारांच्या नेत्याला मंत्रिमंडळातून डच्चू? अमित शाहांचे नाव घेत ठाकरेंच्या खासदाराकडून दावा

Amit Shah Wants 4 Maharashtra Ministers Dropped: संजय राऊत यांनी खळबळजनक दावा करत म्हटलं, अमित शहा यांनी राज्यातील ४ मंत्र्यांना डच्चू देण्याच्या सूचना दिल्या असून त्यात माणिकराव कोकाटे यांचं नाव आहे.

Bhagyashree Kamble

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांची राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंचा रमी खेळत असतानाचा व्हिडिओ व्हायरल केला होता. त्यानंतर विरोधकांनी टीकेची तोफ डागली. यावरून आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी खळबळजनक दावा केला आहे. 'गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यातील चार मंत्र्यांनी डच्चू देण्याचं ठरवलं आहे. त्यात माणिकराव कोकाटेंचंही नाव आहे', असा खळबळजनक दावा त्यांनी केला. त्यांनी केलेल्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, 'माझ्या माहितीप्रमाणे अमित शहा यांनी चार मंत्र्यांना डच्चू देण्याचं सुचवलंय. अमित शहांनी ४ ते ५ मंत्र्यांना वगळण्याचा संदर्भातल्या सूचना मुख्यमंत्र्यांना दिल्या आहेत. एकनाथ शिंदे यांनाही सूचना दिल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसची जी काही नावे आहेत, त्यात कृषीमंत्र्यांचे नाव असल्याची पक्की माहिती आहे', असा दावा त्यांनी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: लातूरमधील घटनेचा विरोधकांकडून निषेध

Kitchen Vastu Tips: किचनमधील 'या' गोष्टीमुळे होतो वास्तुदोष, घरात वाढते नकारात्मक उर्जा

सुनील तटकरेंच्या पत्रकार परिषदेत छावा संघटनेने उधळले पत्ते, नवा वाद उफाळणार|VIDEO

latur Fight : सुनील तटकरेंच्या पत्रकार परिषदेत मोठा राडा; छावा आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची तुफान हाणामारी,VIDEO

विधानसभेत रम्मी खेळल्याप्रकरणी कोकाटेंवर मुनगंटीवारांचा हल्लाबोल, VIDEO

SCROLL FOR NEXT