vaibhav naik, nitesh rane, sindhudurg, barsu refinery saam tv
महाराष्ट्र

Nitesh Rane यांना लाेक पळवून लावतील, हिंमत असेल तर बारसूत जा; वैभव नाईकांचे आव्हान

बारसू प्रकल्पावरुन काेकणसह राज्यातील राजकारण तापलं आहे.

Siddharth Latkar

- विनायक वंजारे

Mla Vaibhav Naik News : नितेश राणे (mla nitesh rane) आपल्या भूमिकेशी ठाम नसतात. वेगवेगळ्या पक्षात वेगवेगळ्या भूमिका घेतात. नितेश राणेंनी स्वतःची स्वतः नेमणूक करून घेतली आहे. भाजपने त्यांना सांगितलेलं नाही. यांना कोणी जबाबदारी देणार नाही असे ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक (mla vaibhav naik) यांनी नितेश राणेंवर टीका केली. (Maharashtra News)

आमदार वैभव नाईक म्हणाले संजय राऊत हे शिवसेनेची, उद्धव ठाकरेंची भूमिका मांडत असतात. त्यांच्या भूमिकांवर बोलण्याचा नितेश राणेंना अधिकार नाही. उदय सामंतांना उद्धव ठाकरेंमुळेच मंत्रीपद व महाडाचे अध्यक्ष पद मिळाले होते. त्यामुळे त्यांना देखील बोलण्याचा अधिकार नाही.

उद्धव ठाकरेंबरोबर असणारे लोक त्यांनाच शिवसेना म्हणत आहेत. प्रकल्पाला विरोध ही शिवसेनेची कधीच भूमिका नसते. फक्त स्थानिकांचा विचार व्हायला हवा ही भूमिका आहे. देवगडमध्ये नितेश राणेंनी काँग्रेस पक्षात असताना नाणारच्या विरोधात भूमिका घेतली होती. भाजपमध्ये आता समर्थनार्थ भूमिका घेतली आहे. हिंमत असेल तर त्यांनी प्रकल्पस्थळी जाऊन भूमिका स्पष्ट करावी असे आव्हान आमदार नाईक यांनी आमदार राणेंना दिले.

बारसु रिफायनरी प्रकल्प लढाईत (barsu refinery latest updates) शिवसेना प्रकल्पग्रस्तांच्या ठामपणे पाठीशी राहील असेही आमदार नाईक यांनी नमूद केले. ते म्हणाले कवडीमाेल किंमतीत जमिन खरेदी केल्या गेल्या. त्यास आम्ही विराेध केल्यानंतर शेतक-यांना पुन्हा जमिनी मिळाल्या. सामान्य शेतक-यांच्या जमिनी लाटण्याचा उद्याेग काेणी करत असेल तर त्याला आम्ही जाेरदार विराेध करणार असेही वैभव नाईक यांनी स्पष्ट केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunita Ahuja: ४० वर्ष सोबत राहणं सोपी गोष्ट...; गोविंदासोबत घटस्फोटाच्या अफावांवर पत्नी सुनीता आहुजा स्पष्टचं बोलली

Maharashtra Live News Update: शरीर संबंध ठेवण्यास नकार दिल्याने नवऱ्याने केली होणाऱ्या बायकोची हत्या

Anant Chaturdashi 2025 live updates : पुण्याच्या गणेशोत्सवातील पहिला मानाचा कसबा गणपतीचं विसर्जन

बीडवरून नगरला फक्त ४० रूपयात, रेल्वे कोणकोणत्या स्थानकात थांबणार? वाचा सविस्तर

Mumbai Accident: अभिनेत्री मानसी नाईकच्या EX पतीचा भीषण अपघात; Video viral

SCROLL FOR NEXT