शिवसेना आमदार संजय गायकवाड यांचे घुमजाव ! SaamTv
महाराष्ट्र

शिवसेना आमदार संजय गायकवाड यांचे घुमजाव !

ऍट्रॉसिटी कायद्याविरोधात बेताल वक्तव्य करणाऱ्या तसेच मातोश्री वरुन आलेल्या आदेशावरुन आपण गावात आलो असल्याच्या सर्व वक्तव्यांवर शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी आता घुमजाव केले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

संजय जाधव

बुलढाणा : खामगाव तालुक्यातील चितोडा गावातील दोन कुटुंबाचा वाद चिघळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या व ऍट्रॉसिटी कायद्याविरोधात बेताल वक्तव्य करणाऱ्या तसेच मातोश्री वरुन आलेल्या आदेशावरुन आपण गावात आलो असल्याच्या सर्व वक्तव्यांवर शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी आता घुमजाव केले आहे. Shiv Sena MLA Sanjay Gaikwad takes back Statement

हे देखील पहा -

आपला मतदार संघ सोडून भाजपा आमदार आकाश फुंडकर यांच्या मतदार संघात शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी चितोडा गावात जाऊन एका विशिष्ट समाजाला चिथावनी देण्याचा व सामाजिक वातावरण कलुषित करण्याचा प्रयत्न केला होता.

मातोश्री वरुन आदेश आल्याने मी या गावात आलो असल्याचे वायरल झालेल्या व्हिडिओमध्ये स्पष्ट झाले होते. असे असताना आता गायकवाड म्हणतात की, माझे बुलढाणा येथील कार्यालयाचे नाव मातोश्री आहे. तिथून इथे आलो असल्याचे स्पष्ट करत आपला बचाव करण्याचा केविलवाणा प्रयत्न संजय गायकवाड यानी केला आहे.

तसेच मी ऍट्रॉसिटी कायद्याविरोधात बोलालो त्यामुळे आहे. मात्र त्यामुळे संपूर्ण दलित समाजाच्या भावना कधीही दुखावणार नाहीत. फक्त काही नेत्यांच्या भावना दुखावल्या असतील असे सांगत या राज्यात 10 ते 20 टक्के दलित नेते ऍट्रॉसिटीच्या नावावर पोट भरतात त्यांच्यासाठी मी बोललो असून यावर मी ठाम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Unmarried Bollywood Actress: 'या' प्रसिद्ध अभिनेत्रींनी अजून केलं नाही लग्न

Mahayuti: नवी मुंबईत राजकीय घडामोडींना वेग; अजित पवार गट महायुतीतून बाहेर पडणार?

Mumbai Shocking : लव्ह, समलैंगिक संबंध अन् १६ वर्षीय मुलाचा संशयास्पद मृत्यू; मुंबईत अनोख्या प्रेमाचा धक्कादायक अंत

Maharashtra Live News Update : वाशिम जिल्ह्यात जोरदार पाऊस, पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा

Pune Crime : कोंढवा तरुणी अत्याचार प्रकरणात पुन्हा ३६० डिग्री टर्न, आरोप असलेल्या तरुणाला अटकच नाही

SCROLL FOR NEXT