दहा हजारांची फौज आणून धडा शिकवण्याची भाषा करणारे शिवसेना आमदार संजय गायकवाड नरमले संजय जाधव
महाराष्ट्र

दहा हजारांची फौज आणून धडा शिकवण्याची भाषा करणारे शिवसेना आमदार संजय गायकवाड नरमले

पत्रकार परिषद घेऊन शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी माघारी घेतलेल्या वक्तव्यांमुळे त्यांच्यावर पक्षातून दबाव वाढत असल्याचे दिसून येत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

संजय जाधव

बुलढाणा : 19 जून रोजी खामगाव तालुक्यातील चितोडा गावात दोन कुटुंबात वाद झाला होता त्या वादाचे रूपांतर हाणामारीत होऊन त्यात दलित कुटुंबातील एकावर प्राणघातक शस्त्राने हल्ला करण्यात आला होता. Shiv Sena MLA Sanjay Gaikwad takes back his words

घटनेच्या 10 दिवसानंतर शिवसेना आमदार संजय गायकवाड़ यानी चितोडा गावात जाऊन चिथावणीखोर भाष्य करत दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्या या बेताल वक्तव्याचा व्हिडीओ समाजमाध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.

हे देखील पहा -

त्यांच्या या वक्तव्याचे राज्यभरात संतप्त पडसाद उमटले.शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी मातोश्री वरुन आलेल्या आदेशान्वये मी गावात आलो आहे, असे सुद्धा वक्तव्य केले होते. मात्र काही काळानंतर त्यांनी त्यावर सारवासारव केली होती.

त्यावर दलित समाजातील अनेक नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबत खुलासा करावा अशी मागणी सुद्धा केली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखत गायकवाड यांनी घुमजाव करत मातोश्री हे माझे बुलढाणा शहरातील कार्यालय आहे तेथून गावात आलो असे सांगितले.

मात्र, आज शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी बुलढाणा येथील त्यांच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेत 10 हजारांची फौज आणून धडा शिकवू तसेच सर्व मदत म्हणजे अस्त्र शस्त्र पुरवेन हे सवर्ण कुटुंबाला धीर देण्यासाठी केलेले वक्तव्य मी माघारी घेत असल्याचे जाहीर केले.

मात्र ऍट्रॉसिटी ऍक्ट विरोधात केलेल्या वक्तव्यावर मी आजही ठाम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यांनी माघारी घेतलेल्या वक्तव्यांमुळे त्यांच्यावर पक्षातून दबाव वाढत असल्याचे दिसून येत आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

फोनवर बोलणं, गाणं ऐकणं नकोच! PMPML च्या कंडक्टर- ड्रायव्हरसाठी नवे नियम

Workout Tips: सकाळी व्यायाम करायच्या आधी काय खावे?

Fact Check : कपड्यांच्या शोरूममध्ये भूत? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय? VIDEO

Shocking : ऑनलाइन डेटा चोरी, महिलेचे नग्नावस्थेतील फोटो, व्हिडीओ व्हायरल; कंपनीवर खटला दाखल

Shani Shingnapur : अभिषेक आता फक्त १०० रूपयांत येणार; शनिशंगणापूर देवस्थान विश्वस्त मंडळाचा निर्णय, VIDEO

SCROLL FOR NEXT