Mla Nitin Deshmukh
Mla Nitin Deshmukh saam tv
महाराष्ट्र

Mla Nitin Deshmukh Agitation: नागपूरच्या वेशीवर आमदार नितीन देशमुखांची पोलिसांकडून उचलबांगडी, संघर्ष यात्रा रोखली (पाहा व्हिडिओ)

जयेश गावंडे

Nagpur News: शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख (mla nitin deshmukh latest news) यांच्यासह त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांना नागपूर पोलिसांनी आज (गुरुवार) सकाळच्या सुमारास नागपूर जिल्ह्यातील धामना गावात स्थानबद्ध केले आहे. पाणीपुरवठा योजनेची स्थगिती उठवा यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी आमदार देशमुख यांची संघर्ष यात्रा जाणार हाेती. त्यापूर्वीच पाेलिसांनी आमदार देशमुखांना ताब्यात घेतले. (Breaking Marathi News)

आमदार नितीन देशमुख (mla nitin deshmukh) यांची अकोल्याहून निघालेली संघर्ष यात्रा नागपूरकडे निघाली होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरासमोर आंदोलन करण्याचा इशारा नितीन देशमुख यांनी दिला होता. मात्र, पोलिसांनी नागपूरच्या वेशीवरच ही संघर्ष यात्रा अडवली. त्यामुळे देशमुख आणि इतर आंदोलकांनी रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू केलं. त्यानंतर देशमुख हे जमिनीवर झोपले. मात्र, काही पोलिसांनी त्यांना उचलून नेले.

पोलिसांनी नितीन देशमुख आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांना अमरावतीच्या दिशेने पोलिस घेऊन गेले. दरम्यान आता मागे हटणार नाहीत. आता ही यात्रा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी घेऊन जाऊ असा इशारा देशमुख यांनी दिला आहे. तर माझा घातपात करण्याचा हेतू काही जणांचा हाेता असा आरोप नितीन देशमुख यांनी केला आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Man Killed girlfriend : प्रेमाचा भयंकर शेवट! मनालीला फिरायला नेलं, गर्लफ्रेंडची हत्या करून मृतदेह बॅगमध्ये कोंबला

Today's Marathi News Live :झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना कोर्टाचा दिलासा नाहीच

Kalyan Crime : भंगार चोरल्याने बेदम मारहाण, मारहाणीत तरुणाचा मृत्यू; कल्याण बसस्थानक परिसरातील घटना

तुळजापूर: देवीच्या सोने-चांदी अपहार प्रकरणी दोषींवर तात्काळ गुन्हे दाखल करा, अन्यथा अवमान याचिका दाखल करणार : हिंदु जनजागृती समिती

Pimpri Chinchwad Hoarding Collapsed: पिंपरी-चिंचवड होर्डिंग कोसळ्याप्रकरणी कारवाई, मालक आणि स्ट्रक्चर ऑडिट करणाऱ्यांविरोधात गुन्हा

SCROLL FOR NEXT