Political Clash in Raigad Saam
महाराष्ट्र

'तटकरेंसारख्या xxx..' महायुतीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; शिंदे गटाच्या आमदाराची दादांच्या खासदारावर जहरी टीका

Political Clash in Raigad: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, तटकरे यांची खेळी आणि शिवसेनेची रायगड जिल्ह्यात वाढलेली ताकद, या विषयांवर शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी रोहा येथे बोलत होते.

Bhagyashree Kamble

  • आमदार महेंद्र दळवींची जिभ घसरली.

  • रोह्यातील भाषणात जहरी टीका.

  • खासदार सुनील तटकरेंबद्दल बोलताना टीका.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रायगडमध्ये पालकमंत्रिपदाचा तिढा अद्याप कायम आहे. भरत गोगावले आणि सुनील तटकरे यांच्यातील वाद कायम आहे. अशातच शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांनी खासदार सुनील तटकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. सुनील तटकरे यांच्या संपूर्ण राजकीय कुरघोड्या काढत त्यांनी टीका केली आहे. टीका करताना दळवी यांची जीभ घसरली.

सुनील तटकरे हे रायगड आणि महाराष्ट्राला फसवणारे नेते आहेत. त्यांचं कामच फसवणूक करणं आहे, असा घणाघाती आरोप दळवींनी तटकरेंवर केला. रोह्यातील एका कार्यक्रमात आमदार महेंद्र दळवी उपस्थित होते. यावेळी तटकरेंवर टीका करताना त्यांची जीभ घसरली. 'तटकरेंसारख्या नालायकांबरोबर जाणार नाही' असा उल्लेख करत दळवींनी 'महायुतीमध्ये राष्ट्रवादीबरोबर आम्ही युती कधीही करणार नाही. आमची एकला चलोची भूमिका आहे', असं यावेळी त्यांनी ठणकावून सांगितलं.

तसेच 'भरत गोगावलेंच्या आईच्या नावावर राजकारण करणं तटकरेंना शोभत नाही. रायगडमधील जनता हे कधीही सहन करणार नाही;, असंही दळवी म्हणाले. या संपूर्ण भाषणात दळवींनी तटकरेंवर आगपाखड केली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, तटकरे यांची खेळी आणि शिवसेनेची रायगड जिल्ह्यात वाढलेली ताकद या विषयावर आमदार महेंद्र दळवी रोहा येथे बोलत होते.

तटकरेंच्या होमग्राऊंडवर दळवींचे तटकरेंना आव्हान

रायगडच्या पालकमंत्रिपदावरून शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये सुरु असलेलं युद्ध काही थांबताना दिसत नाही. दोन्ही पक्ष एकमेकांवर शाब्दिक वार करत आहेत. अशातच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकर यांचे होम ग्राऊंड असलेल्या रोह्यामध्ये शिवसेना आमदार महेंद्र दळवी यांनी तटकरे यांना आव्हान दिलं आहे.

रोह्यातील आपल्या सभेदरम्यान दळवी यांनी तटकरे विरोधी अनेक विधाने केली. 'कुठलीही गोष्ट आली की आम्ही केलं अस सांगतात. अनेक योजना आम्ही आणल्या, त्या कागदावर आमच्या नावावर आहेत, पण त्याच श्रेय लटण्याचं काम तटकरे करतायेत' असा आरोप आमदार दळवी यांनी केला आहे.

याच वेळी दळवी यांनी अलिबाग आणि मुरुडचा विकास सांगताना, 'रोहा नगर पालिकेची २ वर्षे सूत्र आमच्या हातात द्या', असे आवाहन त्यांनी जनतेला केलं. 'पत्रकारांसोबत सर्वकाही बोलू शकत नाही. पण जेव्हा स्फोट होईल तेंव्हा तटकरे साहेबांना वर बघावं लागेल, माझ्याकडे जादूची कांडी आहे', असा इशाराच दळवी यांनी तटकरे यांना थेट दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नगर मनमाड महामार्ग 36 तासांनंतर खुला

Aai Tuljabhavani : सुरक्षा, आनंद, शांती अन् वैभव...; 'आई तुळजाभवानी' मालिकेत साडेतीन शक्तिपीठांचे दर्शन

Mumbai Local: धावत्या लोकलमधून फेकलेला नारळ डोक्याला लागला, तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Abrar Ahmed: अर्शदीप, जितेश आणि हर्षितने उडवली अबरारची खिल्ली; सोशल मीडियावर व्हायरल होतोय व्हिडीओ

Heart Attack Awareness: अचानक श्वास कोंडतोय, चक्कर येतेय? आताच सावध व्हा, कारण हे हार्ट अटॅकचं आहे पहिलं लक्षण

SCROLL FOR NEXT