SHIV SENA SYMBOL CASE Saam Tv
महाराष्ट्र

शिंदे आणि फडणवीस यांना कोंडीत पकडणारा सवाल! पहाटेचा शपथविधी आणि मविआ काळाचा दाखला, कोर्टात नेमकं काय झालं?

Supreme Court Hearing on Shiv Sena Symbol Row: शिवसेना आमदार अपात्रता आणि पक्षचिन्ह प्रकरणाच्या सुनावणीत कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयात २०१९ च्या पहाटेच्या शपथविधीचा मुद्दा उपस्थित केला.

Bharat Mohalkar

Shivsena Symbol Case Hearing : सुप्रीम कोर्टातील शिवसेना आमदार अपात्रता सुनावणीत कपिल सिब्बल यांनी २०१९ च्या पहाटेच्या शपथविधीचा आणि मविआ सरकारच्या काळाचा दाखला देत शिंदे आणि फडणवीस यांच्या भूमिकेवर थेट बोट ठेवले. अजित पवारांसोबत सरकार स्थापन करताना युतीचा धर्म कुठे होता आणि अडीच वर्षे मविआ सत्तेत असताना शिंदेंना काही अडचणी का नव्हत्या, असे धारदार सवाल विचारत सिब्बल यांनी कोर्टात नेमका काय युक्तिवाद केला, वाचा सविस्तर. (Shiv Sena Disqualification Case, Kapil Sibal Supreme Court)

शिवसेना पक्ष-चिन्ह आणि आमदार अपात्रता प्रकरणाच्या सुनावणीला सर्वोच्च न्यायालयात कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केला. सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर कपिल सिब्बल यांनी २०१९ च्या सत्तासंघर्षातील पहाटेच्या शपथविधीचा मुद्दा उपस्थित करत अनेक प्रश्न विचारले.

सुनावणीदरम्यान कपिल सिब्बल यांनी विधानसभा अध्यक्षांच्या आदेशावर बोट ठेवत, ५८ पैकी ३१ आमदार शिंदेंकडे असल्याने त्यांनाच राजकीय पक्ष घोषित करण्यात आल्याचा मुद्दा मांडला. आमदार अपात्रता प्रकरणाच्या प्रतिवादात सिब्बल यांनी २१ नोव्हेंबर २०१९ रोजी झालेल्या विधानसभा निवडणुकीचा आणि त्यानंतरच्या घडामोडींचा आढावा घेतला.

निवडणुकीनंतर भाजपने राज्यपालांनी दिलेले सरकार स्थापनेचे निमंत्रण स्वीकारले नाही. मात्र त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांसोबत पहाटेचा शपथविधी घेत सरकार स्थापन केले; मग त्यावेळी निवडणूक पूर्व युती कुठे होती, असा सवाल सिब्बल यांनी विचारला. फडणवीस यांच्या राजीनाम्यानंतर सरकार कोसळले आणि शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीने एकत्र येत २०१९ ते २०२२ दरम्यान महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. या काळात शिंदे काय करत होते आणि त्यांना तेव्हा काही अडचणी नव्हत्या का, असे प्रश्नही त्यांनी उपस्थित केले.

एखाद्या सत्ताधारी पक्षाचे बहुमत केवळ चार-पाच आमदारांचे असताना, दुसऱ्या पक्षाचे सहा आमदार असहमती दर्शवून दुसऱ्या बाजूला गेल्यास सरकार कोसळू शकते; याला पक्षांतर किंवा बंडखोरी म्हणायचे की स्वसंरक्षण, याचे परिणाम न्यायालयाने गांभीर्याने तपासले पाहिजेत, असा जोरदार युक्तिवाद सिब्बल यांनी केला. सत्ता मिळवण्यासाठी किंवा सरकार स्थिर ठेवण्यासाठी बहुमताचे स्वरूप लक्षात घेऊन अशा राजकीय हालचाली केल्या जातात आणि सध्या सुरू असलेल्या घडामोडी याचाच भाग आहेत. प्राथमिक भूमिका मांडल्यानंतर कपिल सिब्बल यांनी आता आपण आपल्या लेखी युक्तिवादाकडे वळत असल्याचे न्यायालयाला सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मुंबई अध्यक्ष सिद्धार्थ कांबळे यांची उपाध्यक्ष म्हणून निवड

Weight Loss Exercise: नवीन वर्ष सुरू होण्याआधी करायचंय वजन कमी? रोज करा हा एक व्यायाम, झटपट दिसेल फरक!

Maharashtra News : ग्रामीण भागातील नागरिकांना शासकीय आणि डिजिटल सेवा गावातच उपलब्ध होणार

Saree Draping Tips: साडी नेसल्यावर पदर-निऱ्या विस्कटतात? चापून चोपून साडी नेसण्यासाठी फॉलो करा या ७ टिप्स!

पुण्यात भीषण अपघात! बस स्टॉपवर उभ्या असलेल्या विद्यार्थ्यांना टेम्पोने चिरडलं; दोघांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT