Ramdas Kadam, Shivsena, Uddhav Thackeray, Ratnagiri. saam tv
महाराष्ट्र

...म्हणून मी नेतेपदाचा राजीनामा देताेय; रामदास कदमांनी ठाकरेंना लिहिलं जळजळीत पत्र

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी पत्रातून तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

अमोल कलये

रत्नागिरी : शिवसेना (shivsena) नेते रामदास कदम (ramdas kadam) यांनी आज (साेमवार) शिवसेना नेतेपदाचा राजीनामा दिला आहे. कदम यांनी त्याबाबतचे पत्र माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांना पाठविले आहे. शिवसेना पक्षात घुसमट हाेत असल्याने राजीनामा देत आहाेत असं कदम यांनी त्यांच्या पत्रात नमूद केले आहे. कदम यांनी लिहिलेल्या पत्रात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविषयी तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. (Ramdas Kadam Latest Marathi News)

रामदास कदम यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी माझी शिवसेना नेते पदी नियुक्ती केली हाेती. मात्र, शिवसेना प्रमुखांचे निधन झाल्यानंतर नेते पदाला कुठलीही किंमत राहिली नाही, हे मला पहायला मिळालं. आपण मुख्यमंत्री झाल्यानंतर आपल्या व्यस्त कार्यक्रमामधून शिवसेना नेत्यांना विश्वासात घेण्याचं काम आपल्याकडून कधीच झालं नाही. उलटपक्षी मला व माझा मुलगा आमदार याेगेश कदम याला अनेक वेळा अपमानित करण्यात आले.

पुढं कदम लिहितात विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी आपण मला अचानक माताेश्रीत बाेलावून घेतले आणि मला आदेश दिलेत की यापुढे तुमच्यावरती काेणीही कितीही टीका केली किंवा पक्षावर काही बाेलले किंवा माताेश्रीवर काेण काही बाेललं तरी आपण मिडीयासमाेर अजिबात जायचे नाही. मिडीयासमाेर कुठलेही वक्तव्य करायचे नाही. यामागचं कारण मला आजपर्यंत कळू शकलं नाही. गेली तीन वर्ष ताेंड दाबून बुक्क्यांचा मार मी सहन करीत आहेत. ज्या ज्या वेळी शिवसेनेवरती संकटे आली त्या वाईट काळामध्ये माझा संघर्ष उभ्या महाराष्ट्राने पाहिला आहे. महाराष्ट्रातला प्रत्येक शिवसैनिक त्याचा साक्षीदार आहे.

सन 2019 कालावधीत आपण राष्ट्रवादी आणि काॅंग्रेस साेबत सरकार बनवत हाेतात. त्याही वेळी मी आपल्याला हात जाेडून विनंती केली हाेती की शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आयुष्यभर राष्ट्रवादी काॅंग्रेस आणि काॅंग्रेस साेबत संघर्ष केला. हिंदुत्व टिकवलं. राष्ट्रवादी व काॅंग्रेस साेबत युती करु नका, ती बाळासाहेबांच्या विचाराची प्रतारणा हाेईल अशी आपल्याला विनंती केली हाेती. पण आपण त्याही वेळी माझं एेकलं नाही याचेही दुख मनात आहे. शिवसेना प्रमुख असते तर माझ्यावर ही वेळ आली नसती. आणि म्हणून मी आज शिवसेना नेता या पदाचा राजीनामा देत आहे असे कदम यांनी पत्रातून जाहीर केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जळगावात पुन्हा भीषण अपघात टँकरच्या धडकेत आयटीआय विद्यार्थ्याचा मृत्यू; दोन जखमी

Taj Mahal: ताजमहालच्या तळाशी 42 विहिरी का आहेत? काय आहे त्यांचं रहस्य?

Bollywood Actor : हृतिक रोशनशी व्हायची तुलना, प्रियंकासोबत केलंय काम! ओळखूही येत नाहीये 'हा' प्रसिद्ध अभिनेता, VIDEO तुफान व्हायरल

Idli- Dosa For Diabetes: डायबिटीजचे रूग्ण इडली, डोसा खाऊ शकतात का? जाणून घ्या ब्लड शुगर कंट्रोलमध्ये राहण्यासाठी काय खावे?

Gold Price Today: सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी खुशखबर! अचानक भाव घसरला; किती रुपयांनी झालं स्वस्त?

SCROLL FOR NEXT