इंदूरजवळ बस दुर्घटना..अपघातासंदर्भात जळगाव जिल्‍हा प्रशासनाकडून नियंत्रण कक्ष स्थापन

इंदूरजवळ बस दुर्घटना..अपघातासंदर्भात जळगाव जिल्‍हा प्रशासनाकडून नियंत्रण कक्ष स्थापन
Indore Amalner Bus Accident
Indore Amalner Bus AccidentSaam tv
Published On

जळगाव : मध्य प्रदेशात नर्मदा नदीमध्ये आज सकाळी एसटी महामंडळाची बस कोसळून अपघात झाला आहे. यातील बहुतांश प्रवाशी जळगाव जिल्‍ह्यातील असल्‍याची शक्‍यता आहे. या अनुषंगाने जळगाव (Jalgaon) जिल्हाधिकारी कार्यालयाने एक नियंत्रण कक्ष स्थापन केले आहे. याबाबत माहिती जळगाव जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना दिली आहे. (Indore Amalner MSRTC Bus Accident)

Indore Amalner Bus Accident
Indore-Pune Bus Accident: इंदूर-पुणे बसला अपघातावेळी नेमके काय घडले?

जळगाव विभागातील (Amalner) अमळनेर डेपोची अमळनेर ते इंदूर या मार्गावर सकाळी साडेसातला इंदूर येथून अमळनेर डेपोची बस (क्र. एमएच ४० एन ९८४८) परतीच्‍या मार्गाला लागली होती. या दरम्‍यान खरगोन आणि धार या दोन जिल्ह्यांच्या सीमेवर असणार्‍या खलघाट गावाजवळ नर्मदा नदीच्या पात्रात बस (Accident) कोसळली. यात सुमारे ४० प्रवासी असून यातील काही प्रवासी बेपत्ता झाल्‍याचा अंदाज आहे. बचाव कार्य सुरू आहे. यातील बहुतांश प्रवाशी हे जळगाव जिल्‍ह्यातील असल्‍याची शक्‍यता असून जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाने या अपघातासंदर्भात एक नियंत्रण कक्ष स्थापन केले असून या नियंत्रण कक्षाचा क्रमांक ०२५७–२२२३१८० आणि ०२५७– २२१७१९३ असा आहे.

अमळनेर आगाराची टीम रवाना

बस अपघातात सदर बसवरील चालक व वाहकाशी संपर्क होवू शकलेला नाही. यानंतर सदर बस अपघाताची माहिती मिळाल्‍याने जळगाव जिल्‍ह्यातील अमळनेर आगाराची टीम घटनास्‍थळाकडे रवाना झाली आहे. यानंतरच संपुर्ण माहिती मिळू शकेल.

बचाव कार्यावर मुख्यमंत्री शिंदे लक्ष ठेऊन

मध्य प्रदेशात नर्मदा नदीमध्ये आज सकाळी एसटी महामंडळाची बस कोसळून झालेल्या अपघाताबद्धल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे लक्ष ठेवून आहे. येथील बचाव कार्य व्यवस्थित पार पाडावे व जखमींवर लगेच उपचारासाठी मध्यप्रदेशमधील जिल्हा प्रशासनाशी योग्य समन्वय ठेवावा असे निर्देश जळगाव जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com