Chandrakant Khaire Saam Tv
महाराष्ट्र

'५ हजार घ्या, चहा नाष्टा करा आणि सभेला या, मनसेच्या सभेला पैसे देऊन गर्दी'

Raj Thackeray Rally : सभेला जमा होणारे लोक हे पैसे देऊन आणले जात असल्याचा दावा शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत (Chandrakant Khaire) खैरे यांनी केला आहे.

माधव सावरगावे, साम टीव्ही, औरंगाबाद.

औरंगाबाद : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray Rally) हे आज औरंगाबाद (Aurangabad) येथे सभा घेणार आहे. मराठवाडा सांस्कृतिक मंडळ मैदानावर 1 मे रोजी सायंकाळी साडेपाच वाजता राज ठाकरे यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेसाठी जय्यत तयारी सुरू असून लाखोंची गर्दी जमा होणार असल्याचा दावा केला जातोय. मात्र जमा होणारे लोक हे पैसे देऊन आणले जात असल्याचा दावा शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत (Chandrakant Khaire) खैरे यांनी केला आहे.

राज ठाकरे यांच्या सभेला होणाऱ्या गर्दी विषयी माध्यमांनी चंद्रकांत खैरे यांना प्रश्न विचारला असता, त्यांनी ही सभा स्पॉंन्सर असल्याचं म्हटलं आहे. इतकंच नाही तर त्यांनी पत्रकारांनाच आवाहन केलं आहे की, तुम्ही मला विचारण्यापेक्षा तिथे जमलेल्या लोकांना विचारा कुठून आले, किती पैसे मिळाले?. लोक स्वत: तुम्हाला याची माहिती देतील. त्यामुळे या सभेला लाख काय, पाच लाख सुद्धा लोकं आली तर आम्हाला फरक पडणार नाही. हा शिवसेनेचा गड आहे. आमच्या जुन्या मित्राच्या (भाजपच्या) पाठिंब्यानेच ही गर्दी जमवली जात असल्याचं चंद्रकांत खैरे यांनी म्हटलं आहे.

'५ हजार घ्या आणि सभेला या'

पुढे बोलताना चंद्रकांत खैरे म्हणाले की, 'मला वैजापूर आणि औरंगाबादच्या ग्रामीण भागातून फोन आले. ५ हजार रुपये घ्या, चहा नाष्टा करा आणि सभेसाठी हजर रहा अशी ऑफर त्यांना मिळाली आहे. त्यामुळे ही सभा पूर्णपणे स्पॉंन्सर आहे. या सभेला येणारे लोक पैसे घेऊन येणार आहे. त्यामुळे अशा सभेमुळे आमचं वातावरण अजिबात खराब होत नाही' असं चंद्रकांत खैरे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, याअगोदर राज ठाकरे यांच्या या सभेला राजकीय पक्ष, संघटनांकडून विरोध करण्यात आला होता. राज ठाकरेंच्या सभेसाठी पोलिसांची परवानगी मिळाली नव्हती. त्यानंतर मनसेच्या नेत्यांनी पोलीस आयुक्तांचीही भेट घेतली आणि नंतर अखेर पोलिसांनी काही अटी-शर्तींच्या आधारावर सभेला परवानगी दिली. पोलिसांनी फक्त 15 हजार नागरिकांना सभेचं निमंत्रण द्यावं, अशी अट ठेवली आहे. तसेच सभेदरम्यान जात-धर्माशी संबंधित कोणतेही वादग्रस्त वक्तव्य आणि घोषणा केली जाऊ नये, असंही पोलिसांनी बजावलं आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: सिगारेट, पैशांच्या बॅगा आणि मंत्री शिरसाट; संजय राऊतांचा व्हिडीओ पोस्ट करत मोठा गौप्यस्फोट

मराठी-हिंदी वादात ब्रिजभूषण सिंहांची उडी,ठाकरेंना थेट धमकी

गौरवास्पद! UNESCO च्या यादीत पुण्यातील तीन किल्ल्यांचा समावेश | VIDEO

Government Scheme : मुलांसाठी सरकारची नवी योजना? मुलांना महिन्याला 3 हजार?

Sleeping Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार झोपण्याची योग्य दिशा कोणती?

SCROLL FOR NEXT