Surabhi Jayashree Jagdish
छत्रपती शिवाजी महाराज यांना आरमाराचे जनक असं संबोधलं जातं. पण तुम्हाला माहितीये का महाराजांना असं का म्हटलं जातं. याचं कारण आज आपण जाणून घेऊया.
छत्रपती शिवाजी महाराजांनी भारतात पहिल्यांदाच स्वदेशी आणि सक्षम नौदलाची पायाभरणी केली. त्या काळात समुद्राकडे दुर्लक्ष होत असताना महाराजांनी सागरी सामर्थ्याचं महत्त्व ओळखलं. परकीय आक्रमणं, सागरी लूटमार आणि किनाऱ्यांचं संरक्षण यासाठी त्यांनी आरमार उभारलं.
शिवाजी महाराजांनी सुमारे १६५७ नंतर मराठा आरमाराची उभारणी सुरू केली. परकीय सत्तांवर अवलंबून न राहता स्वदेशी जहाजबांधणीवर भर दिला. हे आरमार पूर्णपणे मराठा राज्याच्या संरक्षणासाठी तयार करण्यात आले होते.
समुद्रावर नियंत्रण ठेवलं नाही तर शत्रू सहज आक्रमण करू शकतो, हे महाराजांनी ओळखलं. त्यामुळे भूमीबरोबरच सागरी सुरक्षेलाही त्यांनी समान महत्त्व दिलं. ही दृष्टी त्या काळात अत्यंत क्रांतिकारी होती.
सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, कुलाबा यांसारखे सागरी किल्ले उभारले. हे किल्ले आरमाराचे मुख्य तळ आणि संरक्षण केंद्र होते. यामुळे शत्रूच्या जहाजांवर नजर ठेवणं सोपं होतं.
पोर्तुगीज, इंग्रज, सिद्दी यांसारख्या सागरी शक्तींना महाराजांनी आव्हान दिलं. यावेळी त्यांच्या मनमानी लुटीला महाराजांनी रोखलं. यामुळे मराठ्यांची सागरी दहशत निर्माण झाली.
महाराजांचे आरमार हे आधुनिक भारतीय नौदलाचं मूळ मानलं जातं. स्वराज्याच्या संरक्षणात समुद्रालाही महत्त्व दिलं गेलं. म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांना आरमाराचे जनक म्हटलं जातं.