Shiv Sena Crisis  saam tv
महाराष्ट्र

Shiv Sena Crisis : शिंदेंच्या शिवसेनेची नवी खेळी! ठाकरे गटाचं विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेतेपद धोक्यात?

Shiv Sena Crisis : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण मिळाल्यानतंर शिंदेंच्या नेतृत्त्वातील शिवसेना उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का देऊ शकते.

सुरज सावंत

Shiv Sena Crisis : निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण दिल्यानंतर चिन्ह शिंदे गट अधिक आक्रमक झाला आहे. शिंदे गटाकडून आता ठाकरे गटाची कोंडी करण्याचे प्रयत्न सुरु झाले आहे. एकीकडे राज्यभरातील शिवसेनेचे कार्यलये ताब्यात घेण्याचे प्रयत्न शिंदे गटाने सुरु केलेले आहेत. तर आता दुसरीकडे ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का शिवसेनेकडून दिला जाऊ शकतो.

चिन्ह आणि पक्षाच्या नाव मिळाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेकडून उद्धव ठाकरेंना आणखी एक झटका दिला जाऊ शकतो. ठाकरेंचे विधानपरिषदेमध्ये असलेले विरोधी पक्षनेतेपद घालवण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून हालचाली केल्या जाऊ शकतात.

विद्यमान शिवसेनेच्या आमदारांपैकी किंवा नवनियुक्त अपक्ष आमदारांपैकी विधानपरिषद सभागृह गटनेत्याची नियुक्ती करून व्हिप जारी केला जाऊ शकतो. या व्हिपची अंमलबजावणी शिवसेनेतील सर्वच सदस्यांना बंधनकारक राहील. तसेच या व्हिपचे उलंघन झाल्यास संबंधित आमदारावर कारवाईचीही मागणी केली जाऊ शकते. (Latest Marathi News)

विशेष म्हणजे विधानपरिषदेच्या नवनियुक्त गटनेत्याचा आदेश उद्धव ठाकरे यांना देखील मान्य करावा लागेल. त्यामुळे विधान परिषदेतील ठाकरेंचे विरोधीपक्ष नेते पदही धोक्यात येऊ शकते. परंतु उद्धव ठाकरे यांनी आम्ही वेगळा पक्ष असून निवडणूक आयोगाने आमच्या पक्षाला नाव आणि चिन्ह देखील दिले आहे. त्यामुळे त्यांचा व्हिप आम्हाला लागू होऊच शकत नाही असा दावा केला आहे. (Latest Political News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Uddhav Thackeray : मुंबईवर घाला घातला तर हम काटेंगे; उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल,VIDEO

Watch Video: पावले धरती परतीची वाट! अरं 'देवा' भाऊच्या सभेकडे बहिणींनी फिरवली पाठ

Kolhapur Politics : पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारा प्रकार; कोल्हापुरात प्रचार पत्रकावर तांदूळ, कापलेला लिंबू, अंगारा

Inflation: महागाई कमी होणार? नेटकऱ्याच्या विनंतीनंतर अर्थमंत्री सीतारामन यांनी दिले मोठे संकेत

Maharashtra News Live Updates: विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराचा शांतता कालावधी सोमवारच्या संध्याकाळपर्यंत

SCROLL FOR NEXT