बीड नगरपालिकेविरोधात शिवसंग्राम आक्रमक! विनोद जिरे
महाराष्ट्र

बीड नगरपालिकेविरोधात शिवसंग्राम आक्रमक!

शहरातील घाणीचे साम्राज्य, रस्त्यावर खड्डे, वेळेवर पाणी पुरवठा न होणे, या नागरिकांच्या समस्यांना घेऊन आज शिवसंग्रामच्या वतीने बीड नगरपालिकेवर जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला.

विनोद जिरे

बीड : शहरातील घाणीचे साम्राज्य, रस्त्यावर खड्डे, वेळेवर पाणी पुरवठा न होणे, या नागरिकांच्या समस्यांना घेऊन आज शिवसंग्रामच्या (shivsangram) वतीने बीड (beed) नगरपालिकेवर जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी नगरपालिका प्रशासनाविरोधात प्रचंड प्रमाणात घोषणाबाजी करण्यात आली. हा मोर्चा डॉ.बाबासाहेब आंबेडकर (Dr.Babasaheb Ambedkar) यांच्या पुतळ्यापासून निघून थेट नगरपालिकेवर धडकला.

हे देखील पहा :

शहरातील अनेक प्रभागात साधे रस्तेही व्यवस्थीत नाहीत. रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. खड्ड्यांमुळे नागरिकांना मणक्याच्या आजाराचा त्रास होऊ लागलाय. दोन्ही धरणे पुर्णपणे भरलेले असताना दहा ते पंधरा दिवसाला पाणीपुरवठा केला जात आहे.

शहरातील सीसीटीव्हीसह (CCTV) सिग्नल बंद आहेत. नगरपालिकेच्या भ्रष्ट कारभाराविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी. या मागणीसाठी आज शिवसंग्रामच्या वतीने कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी मोठ्या प्रमाणात महिलांसह बीडकर सहभागी झाले होते.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

SA20 Season 5: पाचव्या सिझनच्या ऑक्शनपूर्वी MI केपटाऊनचा मोठा निर्णय; कायरन पोलार्ड आणि ट्रेंट बोल्टला केलं रिलीज

केळी खाल्ल्यानंतर पाणी प्यायलं तर शरीरात काय होतं? घाबरून जाण्यापूर्वी हे वाचा

Maharashtra News Live Update: विरार पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या उड्डाणपुरावर लहान मुलांच्या शाळेच्या बसमध्ये बिघाड

Fact Check : SIR चा फॉर्म भरल्यावर मिळणार १६ हजार रुपये? व्हायरल पोस्टमागचं सत्य काय?

Coriander Storage: फ्रिजमध्ये कोथिंबीर लगेच काळी पडते? मग या ट्रिक्स वापरा 10 दिवस फ्रेश राहील

SCROLL FOR NEXT