Aurangabad Shivsena Latest News Saam TV
महाराष्ट्र

गद्दारांना कठोरात कठोर शिक्षा मिळायला हवी; औरंगाबादेत महिला शिवसैनिकांना अश्रू अनावर

औरंगाबादेतील शिवसैनिकांनी नाराजी व्यक्त करत एकनाथ शिंदे यांच्याविरोधात घोषणाबाजी केली.

डॉ. माधव सावरगावे

मुंबई : शिवसेनेचे नेते तसेच महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केलं आहे. एकनाथ शिंदे शिवसेनेच्या 30 ते 35 आमदारांना घेऊन गुवाहटी येथे पोहचले आहे. त्यांच्या या पवित्र्यामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अचानक शिंदे यांनी बंड केल्याने शिवसैनिकांमध्ये नाराजी पसरली आहे. दरम्यान, शिंदे यांच्यासोबत औरंगाबाद जिल्ह्यातील 5 आमदार असल्याची माहिती आहे. अशातच औरंगाबादेतील शिवसैनिकांनी नाराजी व्यक्त करत एकनाथ शिंदे यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. (Shivsena Latest News)

एकनाथ शिंदे यांनी अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे शिवसेनेत प्रचंड खळबळ उडाली आहे. याविरोधात सगळीकडे निदर्शने करण्यात येत आहेत. अशातच आज सकाळी औरंगाबाद शहरातील क्रांती चौकात आम्ही उद्धव साहेबांसोबत अशा घोषणा देत निदर्शने करण्यात आली. यावेळी महिला शिवसैनिक भावनिक झाल्याच पाहायला मिळाल्या. यावेळी महिला शिवसैनिकांना अश्रुही अनावर झाले होते. (Shivsena Latest Marathi News)

शिवसेनेकडून जे आमदार निवडूण आले आहेत. त्यांना सर्व शिवसैनिकांसह मतदारांनी मतदान करून अत्यंत मेहनतीने निवडून आणले आहे. त्यांनी पक्षासोबत एकनिष्ठ राहायला हवं होतं. मात्र आज त्यांनी त्यांची निष्ठा विकून टाकत शिवसेनेला संकटात टाकलं. याचा आम्ही निषेध करतो असं म्हणत महिला शिवसैनिकांनी एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोर झालेल्या सर्व आमदारांचा निषेध केला आहे.

इतकंच नाही तर, शिवसेनेसोबत गद्दारी करणाऱ्या या गद्दार आमदारांना कठोरात कठोर शिक्षा मिळावी अशी मागणीही महिला आंदोलकांनी केली. यावेळी महिला आमदारांना अश्रू अनावर झाले होते.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

T20 World Cup : वर्ल्डकपमधून विश्वविजेतेपदाचा प्रबळ दावेदार संघ आऊट, श्रीलंका बाहेर; न्यूझीलंडचा दणदणीत विजय

MSRTC: शिवशाही बस आता नव्या अवतारात येणार; राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

राज्यात रस्ता अपघाती मृत्यूदरात लक्षणीय घट; सरकारचे कोणते उपाय ठरताहेत गेम चेंजर?

खाण उपसंचालकावर व्हिजिलन्सची धाड, अधिकाऱ्याच्या घरात नोटांच्या थप्या

कर्जफेडीसाठी 19 शेतकऱ्यांनी किडन्या विकल्या, विरोधक आक्रमक, अधिवेशनात पडसाद

SCROLL FOR NEXT