Shiv Jayanti : बीडमध्ये पहिल्यांदाच अनोख्या बॅनरबाजीतून मौल्यवान संदेश SaamTvNews
महाराष्ट्र

Shiv Jayanti : बीडमध्ये पहिल्यांदाच अनोख्या बॅनरबाजीतून मौल्यवान संदेश

शिवजयंती निमित्त मावळा प्रतिष्ठानचा अनोखा उपक्रम...

विनोद जिरे

बीड : आजपर्यंत आपण शिवजयंती असेल किंवा इतर कोणत्याही महापुरुषांच्या जयंत्या असतील, त्यावेळी एखाद्या नेत्याचा फोटो , पाच पन्नास कार्यकर्त्यांचे फोटो असणारे होर्डिंग, बॅनरबाजी पाहिली असेल. मात्र, बीडमध्ये शिवजयंती (Shiv Jayanti) निमित्त, अनोख्या बॅनरबाजीतून एक प्रकारचा मौल्यवान संदेश देण्यात आलाय.

हे देखील पहा :

बीड (Beed) शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Shivaji Maharaj) पुतळ्याच्या चहूबाजूंनी, शिवजयंतीनिमित्त मावळा प्रतिष्ठान व बजरंग बली प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी, जवळपास बारा मोठ मोठे बॅनर लावत, त्या बॅनरवर प्रत्येक गड किल्ल्याची माहिती दिली आहे. शिवनेरी किल्ला, पुरंदर किल्ला, प्रतापगड, तोरणा किल्ला, रायगड , राजगड यासह अनेक गडकिल्ल्यांची या बॅनरबाजीतून आकर्षक मांडणी करत, माहिती दिली आहे.

बीड जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज जयंती असो वा इतर कोणत्याही महापुरुषांची जयंती असो, त्या दरम्यान उत्साही नेते अन कार्यकर्त्यांमधून मोठ्या साईजचे बॅनर लावून शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या जातात. मात्र मावळा प्रतिष्ठाणच्यावतीनं अनोखी बॅनरबाजी (Banner) करत, बीडमध्ये मौल्यवान संदेश दिला आहे. दरम्यान हे बॅनर बीडकरांसाठी आकर्षण ठरत आहेत.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'शौक बड़ी चीज है'; चक्क १.१७ कोटींची नंबर प्लेट, VIP आकडा पाहून व्हाल थक्क

Mumbai: एकटक पाहत अश्लील हावभाव अन् चाळे, तरुणीने तरुणाला जन्माची अद्दल घडवली; रेल्वे स्थानकावरच धूधू धुतला; पाहा VIDEO

मोठी किंमत मोजावी लागेल, 'व्हाईट हाऊस'जवळच्या गोळीबारावर ट्रम्प संतापले, म्हणाले दहशतवादी....

Maharashtra Live News Update : मेट्रो प्रशासनाचा निष्काळजीपणा, दुसाचीस्वार पडला महा मेट्रोच्या खोदलेल्या खड्ड्यात

Shocking : नवऱ्याचे अनैतिक संबंध, गर्लफ्रेंडसोबतचे अश्लील फोटो दाखवायचा, लग्नानंतर ६ महिन्यात बायकोने केली आत्महत्या, शेवटच्या चिठ्ठीत...

SCROLL FOR NEXT