ahilya nagar politics  Saam tv
महाराष्ट्र

Ahilyanagar Politics : संगमनेर का किंग कोण? विखे आणि थोरात यांच्यात शिवजयंतीनिमित्त वर्चस्वाची स्पर्धा, नगरमध्ये नेमकं काय घडतंय?

Ahilyanagar Political news : अहिल्यानगर राधाकृष्ण विखे आणि बाळासाहेब थोरात यांच्यात शिवजयंतीनिमित्त वर्चस्वाची स्पर्धा सुरु झली आहे. दोन्ही गटातील चढाओढीमुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

Vishal Gangurde

सचिन बनसोडे, साम टीव्ही

विधानसभा निवडणुकीनंतर देखील संगमनेर मतदारसंघात विखे आणि थोरात यांच्यातील राजकीय संघर्ष काही संपताना दिसत नाहीये. शिवजयंतीच्या निमित्ताने हा संघर्ष पुन्हा एकदा जोर धरू लागलाय. संगमनेर बस स्थानक परिसरात शिवजयंतीच्या निमित्ताने देखावा उभारण्यासाठी दोन्ही गटांमध्ये बरेच दिवस तणाव होता. आता दोन्ही गटाकडून भव्य देखावे उभारत आपापल्या नेत्यांचे वर्चस्व दाखवण्याची स्पर्धा दिसून येतेय..

विखे पाटलांच्या मदतीने शिवसेना शिंदे गटाचे अमोल खताळ यांनी बाळासाहेब थोरात यांचा पराभव करत परिवर्तन घडवून आणले. मात्र बाळासाहेब थोरात यांच्या पराभवानंतर आता त्यांचे भाचे आणि नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे संगमनेर विधानसभा मतदारसंघात सक्रिय झाले आहेत.

शिवजयंती निमित्ताने या दोन आमदारांमध्ये शक्ती प्रदर्शनासाठी चढाओढ सुरू आहे. संगमनेर बस स्थानक परिसरात शिवजयंती उत्सवानिमित्त देखावा उभारण्यासाठी जागेवरून दोन्ही गटांमध्ये बरेच दिवस तणाव होता. मात्र आता बसस्थानकाच्या दोन्ही बाजूला भव्य देखावे उभारण्याचे काम सुरू आहे.

एकीकडे बाळासाहेब थोरात यांच्या गटाकडून छत्रपती शिवाजी महाराज यांचे मंदिर उभारण्याचे काम सुरू असून कमानीवर काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात आणि आमदार सत्यजित तांबे यांचे फोटो लावण्यात आले आहेत. तर दुसरीकडे विखे गटाकडून किल्ल्याची प्रतिकृती उभारण्याचे काम सुरू असून कमानीवर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार अमोल खताळ यांचे फोटो लावण्यात आले आहेत.

शिवजयंतीच्या निमित्ताने संगमनेर मतदारसंघातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघाले असून दोन्ही गटाकडून शक्ती प्रदर्शन करण्याची तयारी सुरू आहे. त्यामुळे संगमनेरमधील यंदाच्या शिवजयंती उत्सवाकडे संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्याचे लक्ष लागले असून संगमनेर का किंग कोण? अशी चर्चा सर्वसामान्य नागरिकांमध्ये सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गोविंदांनी उंच मनोऱ्यावर केला ‘छावा’चा सीन; मुख्यमंत्र्यांनी टाळ्या वाजवून दिली दाद |VIDEO

Maharashtra Live News Update: हिंगोली : राष्ट्रीय महामार्गावर पुराचे पाणी

Peacock Feather Benefits: मोरपिस खिशात ठेवण्याचे फायदे जाणून घ्या

GK: तुम्हाला माहिती आहे का भारतातील शेवटचे गाव कोणते आहे?

Saroj Patil: शरद पवारांची बहीण सरोजताई म्हणाल्या अजित वरून कठीण पण आतून मऊ; रोहित आता धीट नेता|VIDEO

SCROLL FOR NEXT