School Bus Accident Saam tv
महाराष्ट्र

School Bus Accident: स्कुलबसचा अपघात; महिला कर्मचारी जखमी, सुदैवाने मोठा अनर्थ टळला

Shikrapur News : मागील आठ दिवसापूर्वी वाघोली येथील शाळेची बस झाडावर आदळून असाच भीषण अपघात झाला होता

रोहिदास गाडगे

शिरूर (पुणे) : पुण्याच्या शिक्रापूरजवळ श्री वसंतराव डावखरे मेमोरियल स्कूलची बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने थेट झाडावर आदळल्याने भीषण (Accident) अपघात ‌झाला. या अपघातामध्ये स्कूल बसमधील महिला कर्मचारी जखमी झाली असुन सुदैवाने बसमध्ये विद्यार्थी नसल्याने मोठा (Shirur) अनर्थ टळला. घटनेची माहिती मिळतात स्थानिक ॲम्बुलन्स व पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. (Live Marathi News)

मागील आठ दिवसापूर्वी वाघोली येथील शाळेची बस झाडावर आदळून असाच भीषण अपघात झाला होता. यामध्ये काही विद्यार्थी जखमी झाले होते, आता पुन्हा शिक्रापूरजवळ स्कूल बस झाडावर आदळून स्कूल बसचा अपघात झाल्याने विद्यार्थांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अपघात झाला त्यावेळी बसमध्ये केवळ एक महिला होती. चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस झाडावर जाऊन आदळली. यात महिला जखमी झाली आहे.  

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

स्कुलबसवर आरटीओचे हवे नियंत्रण 

सततच्या स्कूल बसच्या वाढत्या अपघातामुळे विद्यार्थी वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सुदैवाने या बसमध्ये विद्यार्थी नव्हते. अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती, मात्र या स्कूल बसवर आरटीओ विभागाने नियंत्रण आणण्याची मागणी आता पालक वर्गाकडून जोर धरू लागली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पोलिस निरीक्षकाने महासंचालकांना पाठवलं आत्महत्येचे पत्र, रायगड पोलिस दलामध्ये खळबळ

Crime: ३ वर्षांच्या मुलीची बलात्कार करून हत्या, मृतदेह खड्ड्यात पुरला; शेजारी राहणाऱ्या तरुणाचं भयानक कृत्य

Sangli ZP School: पालकांचे टेन्शन दूर! मुलं शाळेत पोहचल्यावर आणि सुटल्यानंतर येणार मेसेज; सांगलीच्या ZP शाळेची होतेय चर्चा

Sambhajinagar News : ७ वर्षांच्या मुलीवर सावत्र वडिलांकडून लैंगिक अत्याचार, सख्ख्या आईनेच केली मदत; संभाजीनगरमध्ये खळबळ

Kitchen Hacks : डाळीमध्ये सतत किडे होतात? मग वापरा एकदम सोप्या टिप्स

SCROLL FOR NEXT