Akkalkuwa Accident Saam tv
महाराष्ट्र

Akkalkuwa Accident : देवीच्या दर्शनावरून परतणाऱ्या भाविकांच्या गाडीला अपघात; दोघांचा मृत्यू, १७ भाविक जखमी

Shirpur Dhule News : धुळे जिल्ह्यातील बोराडीच्या रामनगर भागातील भाविक नंदुरबार जिल्ह्यातील देवमोगरा येथे देवीच्या दर्शनासाठी १५ मार्चला गेले होते. दर्शन घेऊन १६ मार्चला ते परत येण्यासाठी निघाले

साम टिव्ही ब्युरो

शिरपूर (धुळे) : देवमोगरा येथे देवीचे दर्शन घेण्यासाठी भाविक गाडी करून गेले होते. दरम्यान दर्शन झाल्यानंतर परतत असताना या भाविकांच्या गाडीला (Accident) अपघात झाला. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर अन्य १७ भाविक जखमी झाले आहेत. वाहनाचा अ‍ॅक्सल तुटल्याने हा अपघात (Akkalkuwa) अक्कलकुवा रस्त्यावर झाला. (Latest Marathi News)

धुळे (Dhule) जिल्ह्यातील बोराडीच्या रामनगर भागातील भाविक नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यातील देवमोगरा येथे देवीच्या दर्शनासाठी १५ मार्चला गेले होते. दर्शन घेऊन १६ मार्चला ते परत येण्यासाठी निघाले. गाडी अक्कलकुवा रस्त्यावर खापर ते उदापूर गावादरम्यान आली असताना भाविक जात असलेल्या गाडीचा अ‍ॅक्सल अचानक तुटला. त्यामुळे चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटून गाडी पुलाखाली कोसळली. या अपघातात चंद्रसिंह रामदास पावरा (वय ३९) व दारासिंह बुधा पावरा (५६) जागीच ठार झाले. तर १७ प्रवाशी जखमी आहेत. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अपघाताची माहिती मिळाताच बोराडी परिसरातील नागरिकांनी धाव घेत मदत केली. यानंतर अपघातातील जखमींना नंदुरबार व अक्कलकुवा येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. जखमींवर सध्या उपचार सुरु असून जखमीमधील तिघांची प्रकृती चिंताजनक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुळशी तालुक्यात अज्ञात व्यक्तींनी लावले डोंगरांना वणवे

Wakad Tourism: वाकडपासून अगदी हाकेच्या अंतरावर आहेत ही थंड हवेची ठिकाणं; या विकेंडला करा प्लान

Belly Fat Loss Drink: पोटाचा वाढलेला घेर कमी करायचा आहे? मग रोज सकाळी प्या हे स्पेशल ड्रिंक

Thane Tourism : मुंबईच्या गर्दीतून घ्या ब्रेक, वीकेंडला फिरा ठाण्यातील 'हे' ५ सुंदर पिकनिक स्पॉट्स

Thursday Horoscope : करिअरमध्ये नव्या संधी मिळतील, ५ राशींचा आनंदात जाणार दिवस; वाचा गुरुवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT