शिर्डी संस्थानच्या नवनिर्वाचित विश्वस्त मंडळाचे अधिकार गोठवले! अभिजित सोनावणे
महाराष्ट्र

शिर्डी संस्थानच्या नवनिर्वाचित विश्वस्त मंडळाचे अधिकार गोठवले!

मागील दोन वर्षांपासून रिक्त असणाऱ्या शिर्डी साईबाबा संस्थानाच्या विश्वस्त मंडळाच्या नियुक्त्या सुरुवातीपासूनच वादाच्या भोवऱ्यात सापडल्याचे पाहायला मिळत आहे.

अभिजित सोनावणे

शिर्डी : मागील दोन वर्षांपासून रिक्त असणाऱ्या शिर्डी साईबाबा संस्थानाच्या विश्वस्त मंडळाच्या नियुक्त्या सुरुवातीपासूनच वादाच्या भोवऱ्यात सापडल्याचे पाहायला मिळत आहे. यासंबंधीच्या वादात आता आणखीनच भर पडली आहे. नवे विश्वस्त मंडळ नियुक्त करा यासाठी कालपर्यंत वाद सुरु होते. मात्र, आता विश्वस्त मंडळाच्या नियुक्त्या झाल्यानंतर देखील वाद काही कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत.

हे देखील पहा :

शिर्डी संस्थानच्या नवनिर्वाचित विश्वस्त मंडळाचे अधिकार गोठवण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. न्यायालयाची परवानगी न घेता विश्वस्त मंडळ नेमल्याने विश्वस्त मंडळाचे अधिकार गोठवण्यात आले आहेत. शिर्डी साईबाबा संस्थानच्या नव्या विश्वस्त मंडळांवर सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी आक्षेप घेतला होता. नवे विश्वस्त मंडळ बेकायदेशीर असल्याचा दावा करत, सदर प्रकरणी काळे यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर औरंगाबाद खंडपीठाने हा आदेश दिला आहे.

शासनाने नेमलेल्या साईबाबा संस्थानच्या नुतन विश्वस्त मंडळाने मुंबई उच्च न्यायालयाची परवानगी न घेता पदभार स्वीकारल्याने न्यायालयाने नाराजी व्यक्त करत नव्या विश्वस्त मंडळाचे अधिकार गोठविले आहेत. यावर आज न्यायालयात झालेल्या कामकाजादरम्यान न्यायालयाने नुतन कमिटीस आर्थिक आणि धोरणात्मक निर्णय घेण्यास मनाई केली आहे. तोपर्यंत जुनी उच्च न्यायालयाने नेमलेली चार सदस्यांची तदर्थ समिती कामकाज पाहिल असंही न्यायालयाने स्पष्ट केले आहे. या प्रकरणी पुढील चार दिवसांनी सुनावणी होणार असल्याचे याचिकाकर्त्यांचे वकील अजिंक्य काळे यांनी सांगितले आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी; गर्दी मराठी भाषेवरच्या अन्यायाविरोधातील, वरळीतल्या ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची

8 Hour Sleep: शरीराला ८ तासाच्या झोपेची आवश्यकता का आहे? वाचा महत्वाचे कारण

Maharashtra Politics: ठाकरे नडणार, महायुतीला भिडणार? राज-उद्धव ठाकरेंची युती बदलणार सत्तेचं गणित?

Maharashtra Politics : आगामी काळात एकनाथ शिंदेंही ठाकरेंसोबत जातील; पुण्यातील बड्या नेत्याचा दावा

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे अखेर एकत्र; या ऐतिहासिक क्षणाची सुरुवात नेमकी कुठून? वाचा सविस्तर...

SCROLL FOR NEXT