Sai Temple Controversy: Family Claims Child Got Vision saam tv
महाराष्ट्र

साईबाबांच्या दर्शनाने अंध मुलाला दृष्टी? साई मंदिरात अंधश्रद्धा की चमत्कार?

Shirdi Sai Darshan 10-Year-Old Regain Sight: शिर्डीच्या साई दरबारात चमत्कार झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरलीय. मात्र हा चमत्काराचा दावा नेमका कुणी केलाय? अंध मुलाला खरंच चमत्काराने दृष्टी आली की ही अंधश्रद्धा आहे? पाहूयात यावरचा स्पेशल रिपोर्टमधून.

Bharat Mohalkar

  • 10 वर्षीय अंध मुलाला शिर्डीत दृष्टी आल्याचा दावा

  • मंदिर प्रशासनाने चमत्कार मानण्यास नकार दिला.

  • या दाव्यामुळे शिर्डीत श्रद्धा, चमत्कार आणि अंधश्रद्धेवर मोठी चर्चा सुरू झालीय

लाखो भाविकांचं शिर्डी हे श्रद्धास्थान. साईंच्या चरणी दररोज हजारो भाविक लीन होतात. मात्र आता याच शिर्डीत अगदी अमर अकबर अँथनी चित्रपटातील सीन प्रत्यक्षात आला आहे .तिथे जशी निरुपमा रॉयला दृष्टी येते. अगदी तसाच चमत्कार साईबाबांच्या दर्शनाने झाल्याचा दावा उत्तराखंडमधील कुटुंबाने केलाय. 10 वर्षाच्या अंध मुलाला जन्मापासून एका डोळ्यानं दिसत नव्हतं. मात्र साईबाबांच्या दर्शनाने दृष्टी आल्याचा दावा त्याच्या कुटुंबियानं केलाय.

उत्तराखंडमधील कुटुंबाच्या दाव्यानंतर खळबळ उडाली असतानाच हा साईबाबांचा चमत्कार असल्याचा दावा विश्वस्तांनी केलाय. साईबाबा संस्थान आणि उत्तराखंडमधील कुटुंबाच्या कथित चमत्काराच्या दाव्यावर अंधश्रद्धा निर्मुलन समितीने कडकडून आक्षेप घेतलाय. एवढंच नव्हे तर चमत्काराच्या दाव्यातील सत्य शोधण्यासाठी 5 नेत्रहीन भक्त तयार असल्याचं सांगत चमत्कार केल्यास अंधश्रद्धा निर्मुलन समितीने थेट 21 लाखांचं बक्षीसच जाहीर केलंय.

हा प्रत्येकाच्या वैयक्तिक श्रध्देचा प्रश्न असला तरी श्रद्धेच्या दुनियेत अनेकदा अंधश्रद्धा वरचढ ठरत असते. एकीकडे मंगळावर वास्तव्य करण्याच्या गोष्टी होत असतानाच भक्तांच्या मनावरचा अंधश्रध्देचा पगडा मात्र काही कमी होत असताना दिसत नाही. एकूणच समाजातली ही अंधश्रध्देची विषवल्ली जोपर्यंत नष्ट होत नाही, जोपर्यंत हा समाज विज्ञाननिष्ठ होत नाही तोपर्यंत अशा समाजाची प्रगती खुंटलेलीच राहील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bihar Election Result Live Updates : बिहारमध्ये एनडीएचे द्विशतक, विरोधक ४० आताच

RJD नाही, JDU नाही....बिहारमध्ये भाजपच सर्वात मोठा पक्ष, आता मुख्यमंत्री कोण होणार?

Hirvi Mirchi Loncha: हिरव्या मिरचीचा झणझणीत लोणचा अवघ्या १० मिनिटांत बनवा, ही आहे सोपी रेसिपी

Maharashtra Live News Update: बिहारमधील विजयानंतर नाशिकमध्ये भाजपचा जल्लोष

बिहार चुनाव तो झाकी है, BMC बाकी है ! बिहारमध्ये NDA ला यश, महाराष्ट्रात जल्लोष, पेढे वाटले, ढोल वाजले

SCROLL FOR NEXT