Shirdi News Meta Ai
महाराष्ट्र

Shirdi News : साखळी गळ्याभोवती बांधायची, लॉक लावून ठेवायची; भंगार गोळा करणाऱ्या महिलेच्या कृत्यानं काळीज पिळवटलं

Shocking News : शिर्डी बस स्थानक परिसरात एक महिला तिच्या बाळाला साखळीने तासंतास हातगाडीशी बांधून ठेवायची. या प्रकारावरुन स्थानिकांनी महिलेला जाब विचारला. तेव्हा महिलेने विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली.

Yash Shirke

सचिन बनसोडे, साम टीव्ही, प्रतिनिधी

शिर्डीमधून काळीज पिळवटून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. बस स्थानक परिसरात एका महिलेने लहान मुलाला हातगाडीला बांधून ठेवल्याची घटना समोर आली आहे. ही महिला त्या लहान मुलाला हातगाडीला तासंतास बांधून ठेवत असल्याची माहिती समोर आली आहे. या धक्कादायक घटनेमुळे शिर्डीत खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिर्डी बस स्थानक परिसरात भंगार गोळा करणारी एक महिला बऱ्याच दिवसांपासून फिरत होते. ही महिला तिच्यासोबत लहान मुलाला ठेवायची. लहान मुलं कुठे जाऊन नये म्हणून ती भंगार विकणारी महिला मुलाला साखळीने हातगाडीला बांधून ठेवायची. स्थानिक नागरिकांनी हा प्रकार उघडकीस आणला आहे.

भंगार विकणारी महिला तिच्यासोबतच्या मुलाच्या गळ्यात साखळीसह कुलुप लावायची. त्या काही वर्षांच्या मुलाला रस्त्यावर साखळीने बांधून ठेवायची. हा प्रकार स्थानिक नागरिकांनी पाहिला. त्यांनी यावरुन महिलेला जाब विचारला. तेव्हा महिलेने नागरिकांना विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली.

स्थानिकांनी या महिलेचा आणि त्या लहान मुलाचा व्हिडीओ काढण्याचा प्रयत्न केला. तेव्हा व्हिडीओ शूट करताच महिलेने मुलाला घेऊन पळ काढल्याची माहिती नागरिकांनी दिली आहे. त्यामुळे त्या महिलेवर कोणतीही कारवाई झाली नाही. नाशिक बस स्थानक परिसरात घडलेल्या घटनेमुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मनविसे च्या 2 कार्यकर्त्यांना पुणे पोलिसांकडून अटक

Badshah Divorce : बॉलीवूडमध्ये पुन्हा खळबळ! 'या' प्रसिद्ध रॅपरने घेतला ५ महिन्यातच घटस्फोट; ईशा रिखीसोबत नाते संपले

Gold Price Today : महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याचे दर बदलले, वाचा तुमच्या शहरातील 24k, 22k, 18k चे लेटेस्ट रेट्स

अमित ठाकरेंवरील गुन्ह्यानंतर पोलिसांची मोठी कारवाई! मध्यरात्री २ नेत्यांना ठोकल्या बेड्या, राजकारणात खळबळ

Operation Tiger: मोठी बातमी! नवरात्रीआधी ठाकरेंचे १४ आमदार फुटणार, शिंदेसेनेत प्रवेश करणार?

SCROLL FOR NEXT