Shirdi Sai Baba Saam tv
महाराष्ट्र

Shirdi Sai Baba : साई चरणी ६५ लाख रुपयांचे सोने चांदीचे दान; गुरुपौर्णिमेनिमित्त भाविकांची साई दरबारी अलोट गर्दी

Shirdi News : अमेरीका स्थित साईभक्त सुभा पै यांच्‍या देणगीतुन साई समाधी मंदिर आणि परिसरात फुलांची आकर्षक सजावट करण्‍यात आली आहे. फुलांची सजावट आणि विविध अभूषणांनी सजलेल्या साईमूर्तीचे मनमोहक रूप बघायला मिळत आहे

Rajesh Sonwane

सचिन बनसोडे 

शिर्डी (अहिल्यानगर) : शिर्डीत आज गुरुपौर्णिमेचा मोठा उत्साह दिसून येत आहे. सकाळपासूनच साईभक्तांनी उत्सवानिमित्त दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे. आलेले भाविक साईचरणी मोठ्या प्रमाणात दान करत असून आजच्या गुरुपौर्णिमेनिमित्ताने साईबाबांच्या चरणी ६५ लाख रुपयांचे सोने आणि चांदीने दान करण्यात आले आहे. अजून देखील दान करणाऱ्यांचा ओघ सुरूच आहे. 

शिर्डीच्या साई मंदिरात साजरा केल्या जाणाऱ्या तीन दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाचा आज मुख्य दिवस आहे. यामुळे आज सकाळपासून साई समाधीसह गुरुस्थान मंदिराच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. साईबाबांना गुरुस्थानी मानून दरवर्षी लाखो साई भक्त शिर्डीत दर्शनासाठी येत असतात. आज देखील सकाळपासूनच भाविकांचा मोठा उत्साह दिसून येत आहे. आज साई मंदिर रात्रभर दर्शनासाठी खुले राहणार आहे.  

५९ लाख रुपयांचा सोन्याचा मुकुट अर्पण 
गुरुपौर्णिला दानशूर भाविकांकडून साईबाबांच्या चरणी गुरुदक्षिणा म्हणून मोठ्या प्रमाणात दान करण्यात येत असते. त्यानुसार सकाळपासून भाविकांकडून मौल्यवान वस्तूंचे दान करणे सुरु आहे. त्यानुसार साई चरणी आतापर्यंत ६५ लाख रुपयांचे सोने चांदीचे दान आले आहे. यात ५९ लाख रुपये किमतीचा सोन्याचा मुकुट, ३ लाख रुपये किमतीचे सोन्याचे फुल आणि २ लाख ८० हजार रुपये किमतीचा चांदीचा हार अर्पण करण्यात आला आहे. 

चार किमी पर्यंत दर्शन रांग 

शिर्डीमध्ये गुरूपोर्णिमेनिमित्त भाविकांची अलोट गर्दी पाहण्यास मिळत आहे. यामुळे साई मंदिराचे दर्शन कॉम्प्लेक्स हाऊसफुल झाले असून नगर- मनमाड महामार्गावर तिन ते चार किलोमीटरपर्यंत भाविकांच्या रांगा लागलेल्या आहे. यामुळे दर्शनासाठी साधारण चार ते पाच तासांचा कालावधी लागत आहे. तरी देखील साईनामाचा जयघोषात भाविक साईचरणी नतमस्तक होत आहेत. गर्दी वाढल्याने संस्थान सुरक्षा रक्षकांची मोठी दमछाक होत असल्याचे पाहण्यास मिळत आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ऐन निवडणुकीत ममता बॅनर्जींना मोठा धक्का, दिग्गज टेनिस खेळाडूचा भाजपमध्ये प्रवेश

Mumbai Local: ट्रेनमध्ये चढण्याच्या प्रयत्नात रुळावर पडला, लोकलखाली चिरडून तरुणाचा मृत्यू

Maharashtra Live News Update: दरोड्यासाठी घुसलेल्या चोरट्यांकडून वृद्धाची निर्घृण हत्या

पठ्याने चक्क पेट्रोलसाठी आणली 500 लिटरची टाकी, पाहा VIDEO

Sunil Pal: मुंबईत प्रसिद्ध कॉमेडियनचा अपमान; मंचावर बोलावून सत्कार केला, नंतर माईक हिसकावून खाली पाठवलं, VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT