Radhakrishna Vikhe Patil Saam tv
महाराष्ट्र

Radhakrishna Vikhe Patil News: त्‍यांचे मानसिक संतुलन बिघडलय, आधारहीन आरोप करण्याची सवय; महसूलमंत्री विखे पाटलांचा राऊतांवर पलटवार

साम टिव्ही ब्युरो

सचिन बनसोडे

शिर्डी (अहमदनगर) : संजय राऊत यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. आधारहीन आरोप करण्याची त्यांची सवय असून स्फोटक विधान करून लोकप्रियता मिळवण्याची (sanjay Raut) संजय राऊत यांची धडपड आहे. असा पलटवार (Radhakrishna Vikhe Patil) महसुल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचा संजय राऊत यांच्‍यावर केला आहे. (Live Marathi News)

महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे आज शिर्डी येथे आले असता त्‍यांनी माध्‍यमांशी संवाद साधला. यावेळी त्‍यांनी संजय राऊत यांच्‍यावर पलटवार केला. महसुलमंत्री (Shirdi) यांनी सांगितले, की त्यांच्याकडे पुरावे असतील तर त्यांनी कुठेही द्यावे आम्ही चौकशीला घाबरणारे नाही. आपल्या मालकाला खुश करण्याचा राऊत यांचा हा प्रयत्न आहे. सिल्वर ओकला जाऊन ते रोज नमाज पढतात आम्ही कधी काही बोललो का? असा सवाल देखील त्यांनी केला.

राऊत भाकरीपुरते काम करतात

संजय राऊतांना सुपाऱ्या दिला जातात आणि भाकरीपुरते हे काम करतात. झाकीर नाईक संदर्भात यापूर्वी सुद्धा आरोप झाला होता आणि त्याची चौकशी सुद्धा झाली. केंद्रीय यंत्रणेने त्याची चौकशी करून हा विषय क्लोज केला. त्या प्रकरणात माझा दुरान्वये संबंध नाही. पुन्हा चौकशी व्हावी अशी यांची इच्छा असेल तर त्याला आमची हरकत नाही. पत्राचाळीच्या बाबतीत मराठी माणूस उध्वस्त झाला. त्याच उत्तर आधी द्या. यापूर्वी सुद्धा एका महिलेच्या शोषणाबद्दल राऊतांवर आरोप झाले. अनेक अशी प्रकरणे असून राऊतांच्या पुष्कळलीला आहेत. मात्र त्या पातळीवर मला जायचं नाही; असे देखील त्‍यांनी सांगितले.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीत विसंवाद नाही

जाहिराती संदर्भात प्रशासकीय पातळीवर चूक झाली आहे का? हे मला माहित नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यात कोणताच विसंवाद नाही. पुर्ण क्षमतेने राज्य सरकार जनतेसाठी काम करत आहे. आपल्या काळातील अपयश झाकण्यासाठी विरोधक आज टिका करतायत. सरकारची लोकप्रियता वाढली हे देखवत नाही. जाहिरातीचा संदर्भ जोडून विसंवाद निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, उपचार घेण्यास नकार

Sambhajinagar Corporation : पाणी पुरवठ्यासाठी करणार सौरऊर्जेचा वापर; शंभर एकर जागेवर संभाजीनगर महापालिका उभारणार प्रकल्प

Maggi Dosa Recipe : मुलांना टिफीनमध्ये द्या झटपट बनवलेला मॅगी डोसा; वाचा 5 मिनिटांत तयार होणारी रेसिपी

Palghar Crime: निर्मात्याकडून अश्लील मेसेज अन् छेडछाड; २६ वर्षीय अभिनेत्रीची पोलिसात तक्रार, मुंबईमधील धक्कादायक प्रकार

Bigg Boss Marathi : संग्रामला टोला, अरबाजचं तोंडभरून कौतुक; उत्कर्ष शिंदे काय म्हणाला ?

SCROLL FOR NEXT